• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • अरे बापरे! दात घासता घासता त्याने चक्क टूथब्रशच गिळला आणि...

अरे बापरे! दात घासता घासता त्याने चक्क टूथब्रशच गिळला आणि...

टूथब्रश तोंडात जाताच तो झोपेतून खडबडून जागा झाला.

  • Share this:
बीजिंग, 05 ऑगस्ट :  लहान मुलांनी एखादी वस्तू गिळणं हे ठिक आहे. कारण त्यांना तसं काही समजत नाही. पण एखाद्या व्यक्तीने असं काहीतरी गिळणं म्हणजे आश्चर्यच आहे. तेसुद्धा टूथब्रशसारखी (Toothbrush) मोठी वस्तू. चीनमील एका व्यक्तीने दात घासता घासता (Brushing)  टूथब्रश (Man Swallowed Toothbrush) गिळला आणि त्यानंतर त्याचं ऑपरेशन करावं लागलं. तैजू येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत ही विचित्र घटना घडली आहे. ही व्यक्ती सकाळी झोपेतून उठली आणि हलक्या झोपेत असतानाच दात घासायला (Brush) लागली. ब्रश करत असताना त्या व्यक्तीने अचानक स्वतःचा टूथब्रशच गिळला. या चिनी माणसाने डॉक्टरांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी तो सकाळी उठला झोपेतून उठताच तयार व्हायला निघाला. रोजची सकाळीची कामं करू लागला. नाश्ता करण्यापूर्वी तो दात घासत होता. त्यावेळी हलक्या झोपेत असल्याने त्याने ब्रश घट्ट पकडला नव्हता. त्याने आपले आतले दात साफ करायला सुरवात करताच ब्रश हातातून निसटला. सरळ त्याच्या तोंडात आतमध्ये गेला. 15 सेमी लांब ब्रश त्याने गिळल्यावर तो अचानक हलक्या झोपतून खडबडून जागा झाला. त्यावेळी ब्रशचा मागचा भाग त्याच्या हाताला लागत होता. मात्र त्याला पकडायला गेल्यावर ब्रश आणखी आत जात होता. त्यामुळे ब्रश आणखीच आतमध्ये गेला. हे वाचा - रात्री झोपण्याआधी ‘या’ पद्धतीने घ्या चेहऱ्याची काळजी; होणार नाहीत Skin Problem ब्रश पूर्णपणे आत गेल्यानंतर त्याला उलटी झाली. त्यानंतर तो ताबडतोब कारने जवळच्या हॉस्पिटलमध्ये (Hospital) पोहोचला. डॉक्टरांनी (Doctor) त्याचा एक्स-रे (X-Ray) काढला. एक्स-रे मध्ये ब्रश दिसताच डॉक्टरांनी त्याच्या पोटाचे ऑपरेशन केले. ऑपरेशन (Operation) सुरू असताना तो ब्रश खूप घरसत होता. त्यामुळे तो पकडून बाहेर काढणं शक्य होत नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी वैद्यकीय उपकरण वापरून तो ब्रश बाहेर काढला. डॉक्टरांनी सांगितलं की, त्या व्यक्तीकडून ब्रश गिळला गेल्यानंतर तो ताबडतोब माझ्याकडे आला. हे त्याने खूप चांगले केले. जर त्याने पारंपरिक पद्धतीचा वापर करून म्हणजेच तांदूळ किंवा व्हिनेगर खाऊन ब्रश बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्याची अन्ननलिका पूर्णपणे खराब झाली असती. हे वाचा - छोटीशी चूकही पडेल प्रचंड महागात; अकाली मृत्यूचे संकेत शरीराकडून हे असे मिळतात सकाळी उठल्याबरोबर प्रथम झोपेतून पूर्ण बाहेर आल्यानंतरच आपली दररोजची कामं सुरू करावीत. घाईमध्ये आवारायला सुरवात केली तर अशा गोष्टी कदाचित जीवावर सुद्धा बेतू शकतात. त्यामुळे काळजी घेऊन दिनक्रम सुरू केलेला केव्हाही चांगलच होईल.
First published: