गर्लफ्रेंडने केलं KISS; तरुणाने तिच्यावर ठोकला कोट्यवधी रुपयांचा दावा

गर्लफ्रेंडने केलं KISS; तरुणाने तिच्यावर ठोकला कोट्यवधी रुपयांचा दावा

गर्लफ्रेंडला किस (kiss) करणं आपल्याला महागात पडल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे.

  • Share this:

लंडन, 24 जून : आपल्या गर्लफ्रेंडने आपल्याला किस केल्यानंतर कोणत्याही मुलाच्या आनंदाला पारावर नाही. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, लंडनमधील एका तरुणाने गर्लफ्रेंडने किस केल्यानंतर थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे आणि गर्लफ्रेंडवर त्याने लाखो रुपयांचा दावा ठोकला आहे.

मार्टिन एशले कॉन्वे असं या तरुणाचं नाव आहे. त्याची गर्लफ्रेंड जोवाना लवलेस हिने त्याला किस केलं, त्यानंतर तो आजारी पडला असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याने आता तिच्याकडून भरपाई मागितली आहे.

मे 2019 मध्ये कॉन्वे आणि जोवाना यांची सोशल मीडियावर मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 4 जुलै 2019 ला जोवानाने कॉन्वेला भेटायला बोलावलं. यानंतर दोघंही सेंट्रल लंडनमध्ये भेटले आणि तिथं त्या दोघांनी एकमेकांना किस केलं आणि यानंतर तो आजारी पडला.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कॉन्वेने सांगितलं त्याला झालेल्या इन्फेक्शनची लक्षणं फ्लूसारखी आहेत आणि त्याच्या तोंडात अल्सरही आलेत. त्याला इतका ताप आला की रुग्णालयात भरती व्हावं लागलं. जोवानामुळेच आपण आजारी पडल्याचं त्याचं म्हणणं आहे.

हे वाचा - 'घरी बोलवून माझ्यावर रेप केला मग...', स्टार खेळाडूनं केला धक्कादायक खुलासा

कॉन्वेने सांगितलं की जोवानाला सर्दी-ताप होता, हे त्याला माहिती नव्हतं. जेव्हा तिचा मेकअप थोडा उतरू लागला तेव्हा त्याला याबाबत माहिती झाली. कॉन्वे म्हणाला यामुळे तो इतका आजारी पडेल याचा अंदाजाही त्याला नव्हता.

कॉन्वेच्या मते, लवलेसने त्याला आपल्याला गंभीर कोल्ड असल्याचं सांगितलं नाही. ज्याचा दुष्परिणाम आता आपल्याला भोगावा लागत आहे. जर आपण आजारी असू तर दुसऱ्या व्यक्तीला त्याबाबत आधीच सांगावं, जेणेकरून ती सावध राहिले, हा सामान्य नियम आहे.

यानंतर त्याने जोवानासह ब्रेकअप केलं. इतकंच नव्हे तर तिच्याकडून भरपाईही मागितली आहे. त्याने तिच्याकडून 136, 328 पाउंड म्हणजे जवळपास एक कोटींपेक्षाही जास्त पैशांची भरपाई म्हणून मागणी केली आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - कसं होतं सुशांत-अंकिताचं नातं? जवळच्या मित्रानं इमोशनल पोस्ट लिहून सांगितलं सत्य

First published: June 20, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading