• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • संतापजनक! पोटच्या 2 वर्षांच्या मुलाला विकलं; त्याच पैशांतून गर्लफ्रेंडसोबत भटकायला गेला बाप

संतापजनक! पोटच्या 2 वर्षांच्या मुलाला विकलं; त्याच पैशांतून गर्लफ्रेंडसोबत भटकायला गेला बाप

गर्लफ्रेंडसोबत मजा मारण्यासाठी पैसा हवा म्हणून त्याने आपल्या पोटच्या चिमुकल्या मुलालाही सोडलं नाही.

 • Share this:
  बीजिंग, 03 मे : आई-वडिल कितीही गरीब का असेना पण त्याची झळ आपल्या मुलांपर्यंत पोहोचू देत नाही. भले नवरा-बायकोत भांडणं होत असतील त्यांचं पटत नसेल पण आपल्या मुलांवर त्या दोघांचीही सारखंच प्रेम असतं. दोघंही वेगळे झाले तरी आपल्या मुलांसाठी त्यांचा जीव तडफडत असतो आणि म्हणूनच मग घटस्फोटानंतर मुलाचा ताबा मिळवण्यासाठीही धडपड सुरू होते. पण आता असा एक बाप समोर आला आहे, ज्याने आपल्या बायकोला तर सोडलंच पण गर्लफ्रेंडसोबत मजा मारण्यासाठी पोटच्या मुलालाही विकलं (Man sold son for money). चीनमधील (China) एका वडिलांनी आपल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला विकलं आहे. त्यातून त्याला जे पैसे मिळाले त्याच पैशांवर तो गर्लफ्रेंडसोबत देश भटकायला गेला. हे वाचा - अजबच आहे! महिलेलाही माहिती नाही ती होती प्रेग्नंट; आकाशातच जन्माला आलं बाळ आज तकने जेजियांग लीगल डेली रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीचं त्याच्या पत्नीसोबत नेहमी भांडण व्हायचं. त्यामुळे त्या दोघांनी घटस्फोट घेतला होता. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलं. मुलीची कस्टडी आईने तर मुलाची बापाने घेतली. ही व्यक्ती दुसऱ्या शहरात काम करत होती त्यामुळे आपल्या मुलाला हुजोई सिटीमध्ये भावाकडे ठेवलं होतं. तो पुन्हा आला आणि त्याच्या आईला त्याला भेटायचं आहे असं सांगून मुलाला घेऊन गेला. त्यानंतर चांग्सू शहरात अशा दाम्पत्याला विकलं ज्यांना मूल नव्हतं. 24 हजार डॉलर्स म्हणजे तब्बल 17 लाख रुपयांना त्याने आपल्या मुलाला विकलं. याच पैशातून तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत देश फिरायला गेला. हे वाचा - दुसऱ्याला उलटी करताना पाहून महिलेला भरते धडकी; पाहताच येतो पॅनिक अटॅक भाऊ मुलाला घेऊन परत आला नाही, फोनही उचलत नाही म्हणून भावाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर या संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. तपास करून पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: