हैदराबाद, 10 मे : जगभरात कोरोना महासाथीने (Corona pandemic) थैमान घातलं आहे. कोरोनापासून संरक्षण मिळावं यासाठी लशी आल्या आहेत. कोरोनावर उपचार करण्यासाठी विविधं औषधं वापरली जात आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाटही येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाच्या या महासाथीतून सुटका कधी होणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. अशातच एका ज्योतिषाने कोरोनाचं नाव बदला कोरोना महासाथ संपेल (Change the name of corona to end pandemic) असा दावा केला आहे.
कोरोनाचं नाव बदलून कोरोना महासाथ संपवण्याचा दावा करणाऱ्या या ज्योतिषाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इम्प्तियाज महमूद नावाच्या ट्विटर युझरने हे पोस्टर शेअर केला आहे. जगभरातील कोट्यवधी लोक कोरोनाशी लढत आहेत, त्यावर आता उपाय सापडला आहे तो इथं आहे, असं कॅप्शन त्यांनी हा पोस्टर शेअर करताना दिलं आहे.
The world has spent trillions fighting Covid, whereas the solution is right here. pic.twitter.com/yZAUsU5iJy
— Imtiaz Mahmood (@ImtiazMadmood) May 8, 2021
"जर Corona चं स्पेलिंग CARONAA आणि Covid-19 चं स्पेलिंग COVVIYD-19 करा. अशा नावासह पोस्टर, बॅनर दरवाजा किंवा सार्वजनिक ठिकाणी लावा. यामुळे फक्त अनंतपुरममधील नव्हे तर संपूर्ण जगातून कोरोना गायब होईल. याची शाश्वती आहे कारण न्यूमेरोलॉजीची ही शक्ती आहे", असा दावा या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.
ज्या व्यक्तीने हा दावा केला आहे. ती आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमच्या न्यूमेरोलॉजिस्ट असल्याचं सांगितलं जातं आहे. पोस्टरवर त्या व्यक्तीचा फोटोही छापण्यात आला आहे. सोबत नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरही आहे.
हे वाचा - चहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण? वाचा काय आहे यामागचं सत्य
ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ज्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रियाही येत आहे. अनेकांनी हा व्यक्ती ज्योतिषी असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी असं आधी का झालं नाही, अशी विचारणा केली. एका युझरने तर, जर यांनी आपल्या नावातील स्पेलिंग बदलली तर हे अमेरिकेचे राष्ट्रपती बनतील का?, असा मिश्कील प्रश्नही विचारला आहे. तर एकाने व्हॉट अॅन आयडिया सरजी अशी कमेंट केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Covid-19