महिलांना चालणंही होतं अवघड; त्या High Heels घालून चक्क धावला पुरुष; पाहा VIDEO

महिलांना चालणंही होतं अवघड; त्या High Heels घालून चक्क धावला पुरुष; पाहा VIDEO

पुरुषाला असं हाय हिल्स घालून धावताना (Man running on high heels) पाहून तुम्ही चक्रवाल.

  • Share this:

मुंबई, 06 मे: हाय हिल्स (High Heels) घालून चालणं सुरुवातीला प्रत्येक महिलेला कठीण जातं. काही महिलांना तर हे घालून चालायचं तरी कसं असाही प्रश्न पडतो. ज्या महिला हाय हिल्स घालतात त्यासुद्धा अगदी हळुवारपणे चालताना दिसतात. पण अशाच हाय हिल्स घालून एक पुरुष चक्क धावला (Man running on high heels) आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला आहे.

हाय हिल्स घालून एक पुरुष काही अंतरापर्यंत वाऱ्याच्या वेगासारखा धावला आहे. त्याने असं धावण्याचा विश्वविक्रम केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्डमध्ये (Guinness World Records) त्याची नोंद झाली आहे.

अँड्रे ओर्टोल्फ असं या व्यक्तीचं नाव आहे. तो जर्मनीतील आहे. त्याने हाल हिल्सवर सर्वात वेगात धावण्याची विक्रम केला आहे.  14.02 सेकंदात तो 100 मीटर धावला. जर्मनीतील ऑगसबर्गमध्ये 14 जून 2019 ला हा रेकॉर्ड त्याने केला.  अँड्रे स्वतःचेच रेकॉर्ड मोडत नवनवे रेकॉर्ड बनवत असतो.

हे वाचा - जंगलाचा राजा सिंह आणि चपळ बिबट्यामध्ये झुंज; कुणी कुणावर केली मात पाहा VIDEO

त्याचा हा व्हिडीओ पाहून तर महिलांनाही त्याचं कौतुक वाटेल. हाल हिल्सवर चालणं म्हणजे कित्येक महिलांसाठी तारेवरील कसरतीपेक्षा कमी नाही. पण अँड्रेने मात्र अगदी सहजपणे त्यावर धावून दाखवलं आहे. हा व्हिडीओ पाहताच अनेक महिलांनी त्याचं कौतुक केलं आहे आणि त्यावर हाय हिल्सबाबत आपले अनुभव मांडत कमेंट केल्या आहेत.

हे वाचा - आंब्याचं वजन इतकं की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

एका युझरने आपण तर साधं हाय हिल्सवर चालूही शकत नाही असं म्हटलं आहे. तर एकिने हा व्हिडीओ पाहूनच आपल्या टाचा दुखायला लागल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: Priya Lad
First published: May 6, 2021, 12:44 PM IST

ताज्या बातम्या