मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गर्लफ्रेंडला प्रपोज करत होते बाबा; चिमुरड्यानं पँट काढली आणि... VIDEO पाहाल तर हसू आवरणार नाही

गर्लफ्रेंडला प्रपोज करत होते बाबा; चिमुरड्यानं पँट काढली आणि... VIDEO पाहाल तर हसू आवरणार नाही

बाबा अगदी साध्या पद्धतीनं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज (propose girlfriend) करत होते मात्र अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्यानं त्यांना मोठं सरप्राइझ दिलं आहे, ज्यामुळे ते हा क्षण कधीच विसरू शकत नाही.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 07 डिसेंबर : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या आयुष्यात महत्त्वाचा क्षण असतो तो प्रपोज (propose). आपल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) रोमँटिक प्रपोज करण्यासाठी बॉयफ्रेंड धडपडत असतो. तिच्यासाठी तो काय काय नाही करत. एखाद्या रोमँटिक ठिकाणी नेतो, तिला सरप्राइझ गिफ्ट देतो. प्रत्येकाची प्रपोज स्टाइल वेगळी असतो. आपलं प्रपोज तिच्या कायम लक्षात राहावं आणि तिनं आपल्याला होकारच द्यावा अशाच पद्धतीनं तयारी केली जाते. अशाच रोमँटिक प्रपोजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  (Video Viral) होतो आहे. ज्यात एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करते आहे पण त्याच वेळी त्या व्यक्तीच्या मुलानं असा काही प्रताप केला आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. अमेरिकेतील हा व्हिडीओ आहे. ज्यात एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करतो आहे. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मुलगाही आहे. अगदी साध्या पद्धतीनं ही व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करते. मात्र त्याच्या अवघ्या तीन वर्षांचा चिमुरड्यानं त्यांना मोठं सरप्राइझ दिलं आहे.  त्यांचा हा साध्या पद्धतीनं केलेला प्रपोजचा क्षण या चिमुरड्याच्या प्रतापामुळेच त्यांच्या कायम लक्षात राहिल. केविन परतीतुला असं या व्यक्तीचं नाव आहे. आपली गर्लफ्रेंड एलीज एलिजाबेथला तो प्रपोज करत होतात. त्यांचा मित्र त्यावेळी व्हिडीओ बनवत होता. व्हिडीओत पाहू शकता, जेव्हा केविन एलीजाला प्रपोज करण्यासाठी आपल्या गुडघ्यावर बसतो तेव्हा त्यांच्यासोबत असलेला केविनचा मुलगा आपल्या वडीलांच्या मागे जातो आणि पाठ करून उभा राहतो. इकडे केविन एलीजाला प्रपोज करतो तर दुसरीकडे त्याचा मुलगा आपली पँट काढतो आणि तिथंच लघवी करायला सुरुवात करतो. हे वाचा - लठ्ठ म्हणून बॉयफ्रेंडनं कुटुंबाशी ओळख करून देणं टाळलं; गर्लफ्रेंडनं घेतला बदला केविन एलीजाला प्रपोज करतो ती त्याला होकारही देतं. दोघंही आपल्या रोमँटिक क्षण अनुभवत असतात. त्याच वेळी त्यांचा व्हिडीओ बनवणारा मित्र त्यांना मागे पाहण्याचा इशारा करतो. जेव्हा दोघंही पाहतात तेव्हा त्यांच्या मुलाला अशा अवस्थेत पाहून ते पोट धरून हसतात.
First published:

Tags: Social media viral, Video viral, Viral, Viral videos

पुढील बातम्या