Home /News /lifestyle /

पत्नीच्या प्रेमप्रकरणाबाबत पतीला लागला सुगावा; आता दुसरचं संकट आलं समोर..

पत्नीच्या प्रेमप्रकरणाबाबत पतीला लागला सुगावा; आता दुसरचं संकट आलं समोर..

Demo Pic

Demo Pic

वैवाहिक जीवनात दांपत्यापैकी एकानं विवाहबाह्य संबंध ठेवले तर गोष्टी खूप गुंतागुंतीच्या होऊन जातात. अशाच एका घटनेत महिलेसमोर मोठाच पेच उभा राहिला आहे.

    लंडन, 1 फेब्रुवारी : एका महिलेने (woman) रिलेशनशिप पोर्टलवर आपल्या वैवाहिक जीवनाविषयीचा (married life) धक्कादायक खुलासा केला आहे. ही महिला दोन मुलांची आई (mother) आहे, मात्र तिचा पती (husband) आता तिसऱ्या मुलासाठी तिच्यावर जबरदस्ती करत असल्याचे त्या महिलेने सांगितलं. पतीला तिसरं मुल का हवंय याचा खुलासाही तिनं केला आहे. तिनं तिच्या आयुष्याची दुखरी बाजू सांगितली. तिचं ऑफिसमधील सहकाऱ्यासोबत प्रेमप्रकरण (love affair) होतं.ज्याचा तिला खुप पश्चाताप आहे. तिनं लिहिलं आहे की, माझा नवरा हॅरी याच्यावरचं माझं प्रेम कमी झालं होतं. मला वाटत होतं की माझा प्रियकर माझ्यावर खरं प्रेम करत होता. मी त्याच्यासह आयुष्य घालवायचं या स्वप्नात जगत होते. पण मला लवकरच समजलं की, माझा प्रियकर मला धोका देतो आहे. त्याच दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे. माझं आयुष्य अवघड करण्याला मीच जबाबदार आहे. त्यात माझ्या या अफेअरबाबत माझ्या नवऱ्याला समजलं. त्यानं मला माफसुद्धा केलं. आम्ही आमच लग्न (marriage) तर वाचवलं पण, तो आता तिसऱ्या मुलासाठी माझ्यावर दबाव टाकत आहे. मला माहित आहे की, हे तो का करतो आहे. मी त्याच्यासोबत बांधलेलं रहावं यासाठी तो हे सर्व करतो आहे. मी त्याला सांगितलं आहे, की मी परत अशी चुक (mistake) करणार नाही. तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी जे वागले त्याचा मला पश्चाताप होतो आहे. हे ही वाचा-बजेट सादर होत असताना कंटाळलेल्या राहुल गांधी यांचे फोटो व्हायरल; मीम्सचा पाऊस मात्र तरीही तो तिसऱ्या मुलासाठी दबाव टाकत आहे. मी तिसरं मुल (child) होऊ देण्यासाठी सक्षम नाही. पहिल्या दोन बाळंतपणातच मी खुप आजारी पडत होते. मला तिसरं मूल नको आहे. महिलेनं पुढं लिहिलं आहे की, तिसरं मुल होऊ देणं हे या प्रश्नाचे उत्तर कसं असू शकतं. मी कायम त्याच्यावर प्रेम करत राहणार आहे, त्याच्याशीच प्रामाणिक असणार आहे. पण त्यासाठी मला तिसऱ्या मुलाच्या जबाबदारीत बांधण्याची गरज नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Women extramarital affair

    पुढील बातम्या