मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

OMG! चक्क सिंहांच्या बाजूला बसून त्याने वाजवली गिटार आणि...; पुढे काय झालं पाहा VIDEO

OMG! चक्क सिंहांच्या बाजूला बसून त्याने वाजवली गिटार आणि...; पुढे काय झालं पाहा VIDEO

सिंह शिकार करत असतानाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण VIDEO कधीच पाहिला नसेल.

सिंह शिकार करत असतानाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण VIDEO कधीच पाहिला नसेल.

सिंह शिकार करत असतानाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण VIDEO कधीच पाहिला नसेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 12 मार्च :  कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकून गायी धावून यायच्या हे आपण सर्वांना माहिती आहे. अगदी शांतपणे त्या कृष्णाच्या बासरीचे मधूर स्वर ऐकायच्या. पण कधी सिंहाला (Lion) असं तुम्ही पाहिलं आहे का? प्रत्यक्ष सोडा असं असं मी स्वप्नातही पाहू शकत नाही, असंच तुम्ही म्हणाल. पण सध्या अशाच सिंहांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media) होतो आहे.

सिंहाचे डोळे, नाक आणि कान... नेहमी कुठे शिकार मिळते का, हेच शोधत असतात. कुणी दिसला रे दिसला ही त्यावर संधी साधून हल्ला करण्यात ते तरबेज असतात. सिंह शिकार करत असतानाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. ज्यामुळे सिंह नेहमी हिंस्र रूपातच दिसतात. अशाच सिंहाचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. त्याने चक्क सिंहांच्या बाजूला बसून गिटार वाजवत गाणंही म्हटलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती गिटार वाजवते आहे आणि तिच्या आजूबाजूला काही सिंह आहेत. ते अगदी त्याच्या कडेलाच शांतपणे बसले आहेत. व्हिडीओत दोन सिंहिणी आणि एक सिंह दिसून येतो. जेव्हा व्यक्ती गिटार वाजवून गात असते. तेव्हा सिंहिणी सिंहाला बिलगतानाही दिसते. जणू काही रोमँटिक गाण्यावर दोघंही छान रोमान्स करत आहे.

हे वाचा - OMG! चक्क हवेत उडू लागली कासवं; दुर्मिळ VIDEO पाहण्याची संधी बिलकुल सोडू नका

थोड्या वेळानं तिन्ही सिंह एका लाइनमध्ये उभे राहतात आणि तिथं पाणी पिऊ लागतात. सिंह पाणी पित असतानाही एक वेगळाच आवाज ऐकायला मिळतो. गिटारची ट्यून आणि सिंह पाणी पित असतानाचा सूर एकत्र मिळतो आणि मग काय संगीताची एखादी मैफिलच रंगल्यासारखी वाटते.

हे वाचा - VIRAL VIDEO: बघिराने केली कुत्र्याची शिकार; ब्लॅक पँथरचा थरार CCTV मध्ये कैद

आयएफएस ऑफिसर सुसांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे.

First published:

Tags: Other animal, Shocking news, Social media viral, Viral, Viral videos, Wild animal