अशीही लव्हस्टोरी! एकाचवेळी केलं दोघींशी लग्न, कारण आहे Romantic

अशीही लव्हस्टोरी! एकाचवेळी केलं दोघींशी लग्न, कारण आहे Romantic

एवढंच नाही तर मुलाने दोन्ही मुलींच्या घरच्यांना हुंडाही दिला. इंडोनेशियामध्ये लग्नात मुलांना मुलीच्या घरच्यांना हुंडा द्यावा लागतो.

  • Share this:

इंडोनेशियात प्रियकराने एकाचवेळी त्याच्या दोन्ही गर्लफ्रेण्डशी लग्न केल्याचा अजब प्रकार घडला आहे. एवढंच नाही तर त्याला त्या मागचं कारण विचारलं असता, दोघींपैकी एकीला दुखावणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्याने एकाचवेळी दोन्ही गर्लफ्रेण्डशी लग्न केल्याचं समोर आलं. सध्या या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात इंडोनेशियातील हा मुलगा एकाच वेळी त्याच्या दोन प्रेयसींशी लग्न करताना दिसत आहे.

'वाइस' इंडोनेशियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 17 ऑगस्टला  हे लग्न एअरटारप, कालीमंतन येथे पार पडलं. एवढंच नाही तर मुलाने दोन्ही मुलींच्या घरच्यांना हुंडाही दिला. इंडोनेशियामध्ये लग्नात मुलांना मुलीच्या घरच्यांना हुंडा द्यावा लागतो. ही तिथली परंपरा आहे. नवरा बायकोची उत्तम काळजी घेऊ शकेल हे दाखवण्यासाठी हा हुंडा दिला जातो.

बहुविवाह (Polygamy) ही पद्धत इंडोनेशियात नवीन नाही. तिथल्या नियमांनुसार एक माणूस चार मुलींशी लग्न करू शकतो. पण यात त्याला मुलीकडच्यांना हुंडा द्यावाच लागतो. यातून तो चार पत्नी सांभाळण्यास सक्षम आहे की नाही ते कळतं. लोकल मीडिया रिपोर्टनुसार, त्या दोन्ही प्रेयसी एकमेकींसोबत चांगल्या वागत असून त्यांना या लग्नापासून काहीच हरकत नव्हती. तसेच स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुलाने सांगितले की, दोघींपैकी एकीला दुखावण्याचा विचार त्याला सहन होण्यापलिकडचा होता म्हणून त्याने हा निर्णय घेतला.

तणावात आहात... मग संत्र सोलत बसा!

ताऱ्यांप्रमाणे चकाकतं हे बीच, पार्टनरसोबत एकदा तरी इथे ट्रीप कराच

डायबेटीजच्या रुग्णांना असतो कॅन्सरचा सर्वाधिक धोका

VIDEO: सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची सर्वांत मोठी मोहीम मुंबईत सुरू होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading