• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • सलग 365 दिवस पाण्यात उडी मारत राहिली ही व्यक्ती; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

सलग 365 दिवस पाण्यात उडी मारत राहिली ही व्यक्ती; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

ही व्यक्ती पोहोण्यासाठी, अंघोळीसाठी किंवा मजा म्हणून असं करत नव्हती, तर तर यामागील कारण विचित्र होतं.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 15 जून: स्विमिंग पूल, नदी, तलाव किंवा समुद्राच्या पाणी पाहिलं की पाण्याचा मनसोक्त आनंद लुटम्याचा मोह कुणालाच आवरत नाही. शक्यतो आपण पाण्यात अंघोळीसाठी, पोहोचण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी उतरतो. पण सध्या अशी एक व्यक्ती चर्चेत आहे, जिनं यापैकी कोणतंही कारण नसताना गेली सलग 365 दिवस पाण्यात उडी मारली (Man jumped into lake for 365 days) आहे. कोरोना महासाथीत दररोज न विसरता पाण्यात उडी मारणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. गेले 365 दिवस या व्यक्तीने तलावात उडी मारण्याचा आपला दिनक्रम मोडलेला नाही. डॅन ओकोनोर असं या व्यक्ती नाव आहे, तो शिकागोत राहणारा आहे. मिशिगन तलावात त्याने गेल्या वर्षी उडी मारणं सुरू केलं. 12 जून 2021 ला त्याच्या या मिशनला 365 दिवस पूर्ण झाले आहेत. व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती फक्त उडी मारते आणि पाण्यातून लगेच बाहेर येते. आता ही व्यक्ती पोहोण्यासाठी, अंघोळीसाठी किंवा मजा म्हणून असं करत नव्हती, तर तर यामागील नेमकं कारण काय होतं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. या व्यक्तीने तणावमुक्त राहण्यासाठी असाच हा विचित्र मार्ग निवडला आहे. हे वाचा - लग्नासाठी नाचत होती लेक, आईची सटकली आणि...; काय घडलं पाहा VIDEO कोरोना महासाथीत कित्येक लोक मानसिक तणावाशीही लढा देत आहेत. प्रत्येक जण आपलं मानसिक आरोग्य राखण्यासाठी, मनावरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डॅन ओकोनोर म्हणतो, "पाण्यात उडी मारल्यानंतर मला वाटतं की माझ्यापर्यंत कोणताच आवाज पोहोचू शकत नाही. तिथं मी फक्त स्वतःसोबत असतो. ध्यानाच्या स्थिती जातो" हे वाचा - काय सांगता! 'या' देशात राहते पावसाची राणी जेव्हा थंडीत पाणी गोठलं होतं. तेव्हा बर्फाच्छादित पाण्याच्या मध्ये एक खड्डा बनवून तिथं त्याने उडी मारायला सुरुवात केली. यादरम्यान त्याच्या शरीरावर जखमाही झाल्या. पण लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियामुळे हे काम कायम ठेवण्यास प्रेरणा मिळाल्याचं ओकोनोर सांगतो.
  Published by:Priya Lad
  First published: