वॉशिंग्टन, 14 वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (america) नेब्रास्कामध्ये राहणारा 30 वर्षांचा व्यक्ती... या व्यक्तीला खूप थकवा जाणवू लागला. त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, कावीळ, डायरियाही झाल्या. त्याला रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्या. तेव्हा त्याच्या यकृताला हानी पोहोचल्याचे, त्याचे अवयव निष्क्रिय होऊ लागल्याचं दिसलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या नसांमध्ये मशरूम (mushroom) उगवले होते.
30 वर्षांच्या व्यक्तीला बाइपोलर डिसॉर्डर आहे. या मानसिक आजारासाठी त्याला डॉक्टरांनी साइकेडेलिक मशरूम (Psychedelic Mushroom) खाण्याचा सल्ला दिला होता. या मशरूममध्ये साइलोसाइबिन (Psilocybin) घटक असतो ज्यामुळे मेंदू शांत राहतो.या व्यक्तीनं पाण्यात मशरूम उकळले आणि ते पाणी गाळून घेतलं त्यानंतर इंजेक्शननं आपल्या शरीरात सोडलं. आज तकच्या रिपोर्टनुसार जर्नल ऑफ द अकॅडममी ऑफ कन्सलटेशन लायसन साइकेट्रीमध्ये हे प्रकरण प्रकाशित करण्यात आलं आहे.
साइकेडेलिक मशरूमला मॅजिक मशरूमही म्हटलं जातं. मानसिक आजारांवर याचा वापर होतो. मानसिकरित्या खचलेल्या कॅन्सर रुग्णांसाठीही याचा वापर होतो. जॉन हॉपकिन्स आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या संशोधनातही याचे फायदे सांगण्यात आले आहेत. याचा औषधांमध्ये वापर केला जातो. शिजवून खाल्लं जातं. तर काही लोक नशेसाठीही वापरतात.
हे वाचा - जिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला
या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, त्याला बायपोलर डिसॉर्डर होता. ज्यामुळे तो कधी कधी खूप आक्रमक व्हाययचा तर कधी एकदमक शांत. त्यामुळे त्याला साइलोसाइबिन औषध घेण्यास सांगण्यात आलं होतं. साइकेडेलिक मशरून खाण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण ते मानसिक आजारांवर फायदेशीर असतं. पण या व्यक्तीनं ते पाण्यात उकळलं आणि इंजेक्शनमार्फत घेतलं. पण याचा डोस आणि ते घेण्याची वेळ योग्य असायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ते घ्यावं लागतं.
हे औषध कधीच इंजेक्ट करू शकत नाही. ते फक्त शिजवून खाऊ शकतो. याची पावडर किंवा पाणी हानीकारक असतं. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं आहे, तसाच याचा वापर करावा.
हे वाचा - मेंदूतही घुसतोय कोरोना; फु्फ्फुसांतील संसर्गापेक्षाही गंभीर अवस्था
या व्यक्तीची प्रकृती इतकी गंभीर होती की त्याला लगेच वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि त्याचं रक्त बदलण्यात आलं, रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यात आले. जवळपास 22 दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण त्यालाअँटिबायोटिक्स आणि अँटिफंगल औषधं देण्यात आली. अँटिफंगल औषध त्याला पुढील काही वर्षे घ्यावी लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, World news