Home /News /lifestyle /

ना चोरी, ना लूट! क्वारंटाइनमध्ये फक्त 8 सेकंद रूमबाहेर आला; अडीच लाख रुपयांचा फटका बसला

ना चोरी, ना लूट! क्वारंटाइनमध्ये फक्त 8 सेकंद रूमबाहेर आला; अडीच लाख रुपयांचा फटका बसला

आपले 8 सेकंद इतके महागात पडू शकतात याचा विचारही या व्यक्तीनं केला नसावा.

    तैपई, 09 डिसेंबर : फक्त 8 सेकंदात लाखो रुपयांचा फटका बसणं म्हणजे एक तर चोरी किंवा लूट. पण एका व्यक्तीसोबत असं काहीच झालं नाही पण तरी त्यानं अडीच लाख रुपये गमावलेत. क्वारंटाइनमध्ये (quarantine) असलेली ही व्यक्ती फक्त 8 सेकंदासाठी आपल्या रूमबाहेर आली आणि तब्बल अडीच लाख रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना आहे तैवानमधील (taiwan). फिलिपिन्समध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला तैवानच्या गाऊशुंग शहरातील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं होतं.  आज तकनं तैवानाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार क्वारंटाइनमध्ये राहणारी व्यक्ती काही सेकंदच आपल्या रूममधून बाहेर आली आणि हॉलमध्ये गेली. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती आरोग्य विभागाला दिली. यानंतर आरोग्य विभागानं व्यक्तीला दंड ठोठावला. शंभर-दोनशे रुपये नाही तर तब्बल अडीच लाख रुपयांचा दंड त्या व्यक्तीला भरावा लागला. हे वाचा - CORONA नव्हे तर ‘हा’ शब्द ठरला Word Of The Year; सर्वाधिक लोकांनी शोधला अर्थ तैवानमध्ये क्वारंटाइनचे नियम खूप कठोर आहेत. लोकांना आपल्या खोलीतूनही बाहेर पडण्याची परवानगी नाही. जितके दिवस क्वारंटाइनचे आहेत, तितके दिवस आपल्या रूममध्ये राहावं लागतं. रूममधून बाहेरही पडता येत नाही आणि हीच चूक या व्यक्तीनं केली, ज्याची इतकी मोठी शिक्षा भोगावी लागली. ज्या चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला, त्या देशाच्या अगदी शेजारी असूनही तैवानमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी आहेत. कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात तैवान यश्वी ठरलं आहे. तैनमध्ये कोरोनासंबंधी नियम खूप कठोर आहेत आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. याचंच हे एक उदाहरण आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या