• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • कोरोना या व्यक्तीचं काहीच बिघडवू शकत नाही; त्याच्याकडे आहेत सुपर अँटिबॉडी

कोरोना या व्यक्तीचं काहीच बिघडवू शकत नाही; त्याच्याकडे आहेत सुपर अँटिबॉडी

या व्यक्तीच्या शरीरातील अँटिबॉडीज (antibody) 10 हजार वेळा जरी विभाजित केल्या तरी त्या कोरोनाचा प्रतिकार करू शकतात.

  • Share this:
वॉशिंग्टन, 15 मार्च: जगभरातील लोक कोरोनाविरोधात तयार होणाऱ्या अँटीबॉडी (antibody) आणि कोरोना (corona) लशीवर(vaccine) लक्ष ठेवून असताना, तिकडे अमेरिकेतील (america) व्हर्जिनियातील (virginia) एका व्यक्तीकडे सुपर अँटीबॉडी असल्याचं आढळून आलं आहे. या व्यक्तीचं नाव जॉन हॅलिस (john hollis) असून त्याच्या शरीरातील अँटीबॉडीज कोरोना विषाणूविरोधात पूर्णपणे प्रभावी आहेत. इतकंच नाही तर असं बोललं जात आहे, की जॉन हॅलिसकडील अँटीबॉडीपासून अशी लस तयार केली जाऊ शकते, की जी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचं पूर्णपणे निर्मूलन करेल. जॉन यांच्या शरीरातील अँटीबॉडी इतक्या शक्तीशाली (powerfull) आहेत आहे की त्या 10 हजार वेळा जरी विभाजित केल्या तरी त्या रोगाचा प्रतिकार करू शकतात. याबाबत जॉन यांनी स्वतः माहिती दिली. याबाबत ते म्हणाले, गेल्या वर्षी मी माझ्या मुलासोबत युरोप दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा त्यांना थोडं आजारी असल्यासारखं वाटत होतं. पण हवामानामुळे अॅलर्जी झाली असेल असं त्यांना वाटलं. काही दिवसांनंतर त्यांच्या रुममधील एक सहकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. या सहकाऱ्याची प्रकृती काही काळानंतर अधिकच बिघडली. यामुळे जॉन बेचैन झाले आणि ही वेळ आपल्यावरही येऊ शकते असं त्यांना वाटू लागलं. हे वाचा - Explainer: सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनचं धोरण का योग्य नाही? वाचा जाणकाराचं म्हणणं जॉन म्हणाले, की माझ्या मित्राची स्थिती पाहून मी खूप घाबरलो होतो. ही वेळ आपल्यावरही येईल या भीतीनं मी माझ्या मुलाला शेवटचं पत्र देखील लिहिलं होतं पण हे पत्र मला मुलाला द्यायची वेळ आली नाही. खूप दिवसानंतर माझा मित्र ठणठणीत होऊन परतला मात्र मी आजारीच पडलो नाही. एका कंपनीत कम्युनिकेशन मॅनेजर पदावर काम करीत असलेल्या जॉन हॅलिसची देखील डॉक्टरांनी तपासणी केली. डॉक्टरांनी जॉन यांच्या लाळ आणि रक्ताची तपासणी केल्यानंतर असं दिसून आलं की जॉन यांना कोरोना झाला होता, परंतु त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीने त्यावर हल्ला केला. हे वाचा - राज्यात कोरोनाचा उद्रेक! पुन्हा लॉकडाऊन? अखेर आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती याबाबत डॉ. लॅन्स यांनी सांगितलं की जॉन यांच्या शरीरातील अँटीबॉडी एवढ्या शक्तीशाली आहेत की त्यांना 10 हजार भागात विभाजित केलं तरी ते आजाराचे निर्मूलन करण्यास सक्षम असतील. सोप्या भाषेत हा प्रकार सांगयचा झाला तर विषाणूच्या पृष्ठभागाभोवती स्पाइक प्रोटिन असतात ज्याच्या मदतीनं तो मानवी शरीरावर हल्ला करतो. जर एखाद्या माणसामध्ये अँटीबॉडीज चांगल्या असतील तर त्या विषाणूच्या टोकाला चिकटून बसतात, त्यामुळे विषाणू मानवी शरीरावर हल्ला करू शकत नाही. जॉन यांच्या शरीरातील अँटीबॉडी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला देखील हरवू शकतात.
First published: