पिंजऱ्यात लॉक केलं डोकं, चावी बायकोच्या हातात; कारण वाचूनच थक्क व्हाल

पिंजऱ्यात लॉक केलं डोकं, चावी बायकोच्या हातात; कारण वाचूनच थक्क व्हाल

सामान्यपणे हेल्मेट घातलं की तसं ते काढताही येतं. पण या व्यक्तीने घातलेलं हे पिंजऱ्यासारखं हेल्मेट (Man head in cage) त्याला काढता येत नाही, त्यासाठी दुसऱ्या कुणाची तरी मदत घ्यावी लागते.

  • Share this:

अंकारा, 12 मे : हा फोटो पाहून तुम्हाला सुरुवातीला वाटेल की या व्यक्तीचं डोकं या पिंजऱ्यात (Man head in cage) अडकलं आहे की काय? किंवा काही जणांना वाटेल बाईकवर घालण्यासाठी हे नवं, हटकं असं हेल्मेट तयार करण्यात आलेलं आहे का? मात्र तुम्हाला जे काही वाटतं आहे, त्यापैकी काहीच नाही. हेल्मेटसारख्या पिंजऱ्यात डोकं असलेल्या या व्यक्तीची कहाणी (Man locked head in cage) वेगळीच आहे. जी तुम्हाला समजली तर तुम्ही थक्कच व्हाल.

या व्यक्तीचं नाव आहे इब्राहिम युसेल. तुर्कस्तानमध्ये राहणारी ही व्यक्ती. त्याने स्वतःच हे खास आणि हटके असं हेल्मेट तयार केलं आहे. 130 फीट तांब्याच्या वायरपासून हे हेल्मेट बनवण्यात आलं आहे. त्यानंतर त्याने ते स्वतःच्याच डोक्यात घातलं.

सामान्यपणे हेल्मेट घातलं की तसं ते काढताही येतं. पण इब्राहिमने हे हेल्मेट घातलं की त्याला काढता येत नाही, म्हणजे त्यासाठी दुसऱ्या कुणाची तरी मदत घ्यावी लागते. या हेल्मेटला लॉक असून त्याची चावी त्यांच्या बायको, मुलांकडे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडे असते.

हे वाचा - जोराच्या वाऱ्यात तुटला चीनचा Glass bridge; 330 फुटांवर लटकत राहिला पर्यटक आणि...

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इब्राहिम नेमकं असं का करतो आहे? त्याने हेल्मेटसारख्या पिंजऱ्यात आपलं डोकं का लॉक केलं आहे? तर यांचं कारण आहे ते म्हणजे त्याला असलेली एक वाईट सवय. स्मोकिंग. हो आपल्या धूम्रपानाच्या सवयीमुळेच इम्रानने आपलं डोकं पिंजऱ्यात लॉक करून ठेवलं आहे. आपली ही सवय सोडवण्यासाठी त्याने हा अजब जुगाड केला आहे.

रिपोर्टनुसार वयाच्या सोळाव्या वर्षापासून इब्राहिम स्मोकिंग करत होता. दररोज दोन पॅकेट सिगारेट पित होता. पण एका घटनेमुळे त्याला आपण स्मोकिंग सोडावं असं वाटलं आणि ही घटना म्हणजे त्याच्या वडिलांचा मृत्यू. त्याच्या वडिलांचा फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला. तेव्हाच इब्राहिमने आपलं आणि आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सिगारेट सोडायला हवी, असा निश्चय केला.

हे वाचा - बापरे! चेहऱ्यावर शेव्हिंग क्रीमऐवजी त्याने लावलं हेयर रिमुव्हल क्रीम आणि मग...

पण काही केल्या त्याची ही सवय सुटत नव्हती. कधी ना कधी त्याला सिगारेटची तलब यायची. पण त्याचा निश्चय पक्का होता. त्यामुळे त्याने हा अजब मार्ग शोधून काढला. त्याने आपलं डोकं या हेल्मेटसारख्या पिंजऱ्यात लॉक केलं आणि त्याची चावी कुटुंबाकडे दिली. आता फक्त खाण्या-पिण्यासाठीच तो हे हेल्मेट काढतो.

Published by: Priya Lad
First published: May 12, 2021, 8:58 PM IST

ताज्या बातम्या