Home /News /lifestyle /

प्रेमासाठी वाट्टेल ते! गर्लफ्रेंडला महागडं गिफ्ट देण्याच्या नादात मृत्यूच्या दारात पोहोचला तरुण

प्रेमासाठी वाट्टेल ते! गर्लफ्रेंडला महागडं गिफ्ट देण्याच्या नादात मृत्यूच्या दारात पोहोचला तरुण

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

गर्लफ्रेंडला महागडं गिफ्ट (Expensive gift for girlfriend) देण्यासाठी तरुणाने विचित्र असा मार्ग निवडला.

    हरेरे, 25 मे : एखाद्या तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी किंवा आपल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend), बायकोला (Wife) आनंदी ठेवण्यासाठी तरुण आणि पुरुषांचा सर्वात उत्तम फंडा म्हणजे त्यांना आवडणारं किंवा महागडं असं गिफ्ट देणं (Gift to girlfriend). मग आपली ऐपत नसली किंवा खिशात पैसे नसले तरी हे लोक कुठून ना कुठून पैसा जमा करतात किंवा काही ना काही मार्ग शोधतातच. असंच गर्लफ्रेंडला महागडं गिफ्ट देण्याचा नादात एक तरुण मृत्यूच्या दारात पोहोचला (Man want give expensive gifts to girlfriends) आहे. झिम्बाब्वेतील एका व्यक्तीला आपल्या गर्लफ्रेंडला दीड कोटींची कार देण्याची इच्छा (Man fasting for give expensive car to girlfriend) होती. पण त्याच्याडे पैसे नव्हते. पण काही करून आपल्या गर्लफ्रेंडला कार द्यायचीच हे त्याने पक्कं केलं होतं. यासाठी तो काहीही करायला तयार होता आणि झालं तसंच त्याने असा मार्ग अवलंबला जो ऐकूनच तुम्हाला धक्का बसेल. मार्क मुराजजीरा असं या तरुणाचं नाव आहे. तो 27 वर्षांचा असून सेंट्रल झिम्बाब्वेच्या रिसेन सेंटस चर्चमध्ये काम करतो. मार्कचा देवावर खूप विश्वास. त्यामुळे देव आपली नक्कीच मदत करेल अशी आशा त्याला होती. आपण कडक व्रत केलं तर देव आपल्याला दर्शन देईल असा विश्वास त्याला होता. देवाने दर्शन देताच आपण त्याच्याकडून लेम्बोर्गिनी कार मागून घेऊ आणि आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट करू, असं त्याने ठरवलं.  तब्बल 40 दिवस काहीही न खाता कडक व्रत करण्याचा निश्चय त्याने केला. आपल्या या व्रतात खंड पडू नये, म्हणून तो दूर डोंगरावर निघून गेला. हे वाचा - अरे बापरे! मांजर पाळणाऱ्या चिमुकलीचे गळू लागले केस; टक्कल करण्याची ओढावली वेळ आज तकने Mbare Times चा हवाला देत दिलेल्या रिपोर्टनुसार मार्कचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्याला शेवटचं पाहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, मार्कने त्याला 40 दिवस आणि 40 रात्रउपवास करून देवाला प्रसन्न करून लॅम्बोर्गिनी कार मागून घेणार असल्याचं सांगितलं होतं. मार्क गायब झाल्यानंतर तो 33 व्या दिवशी सापडला. तो खूप अशक्त झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चर्चे बिशप मावरू यांनी सांगितलं की तो बेरोजगार आहे. मार्कच्या काही साथीदारांनी त्याच्यासाठी काही पैसे जमवले होते, जे त्याच्या उपचार आणि औषधांवरच खर्च होत आहेत. हे वाचा - Lockdown side effects: घरगुती वाद वाढले, पती-पत्नींच्या नात्यावर होतायेत परिणाम सामान्यपणे एखादी व्यक्ती अन्नाशिवाय तीन आठवडे जिवंत राहू शकते. तीन ते चार दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी न प्यायल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. आता मार्क किती दिवस अन्न-पाण्याशिवाय राहिला हे माहिती नाही, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Boyfriend, Girlfriend, Love, Relationship

    पुढील बातम्या