VIRAL VIDEO : एका झुरळाला मारण्यासाठी घरात फोडला बॉम्ब आणि...

VIRAL VIDEO : एका झुरळाला मारण्यासाठी घरात फोडला बॉम्ब आणि...

तुमच्या घरातही झुरळ असतील तर त्यांना मारण्याआधी पाहा हा VIRAL VIDEO.

  • Share this:

एका झुरळाला मारण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. मात्र कधी तुम्ही एका झुरळाला मारण्यासाठी बॉम्ब लावल्याचे ऐकले आहे का? असा प्रकार ब्राझीलमध्ये घडला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र असे करूनही झुरळांना मारण्यात या पट्ट्याला यश आले नाही. ही घटना आहे ब्राझीलची.

न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार, काही किडे घरासमोर असलेली बाग खराब करत असल्यामुळं त्यांना मारण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या. मात्र कशाचाही परिणाम झाला नाही. त्यानंतर या व्यक्तीनं त्यांचा कायमचा खात्मा करण्यासाठी चक्क घराबाहेर स्फोट घडवला.

बागेत असलेल्या किड्यांना मारण्यासाठी या व्यक्तिनं गॅसोलिन टाकून आग लावली. मात्र झुरळ तर मेले नाही उलट, बगीच्यात मोठे भगदाड पडले. हा सगळा प्रकार बागेत असलेल्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला. त्यामुळं झुरळाला मारण्यासाठी केलेला प्रयत्न महागात पडला. या प्रकारानंतर घरात असलेल्या पाळीव कुत्र्यालाही कापरी भरली.

या व्हिडीओमध्ये स्फोटानंतरही हा किडा रांगता दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ 2.6 कोटी लोकांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर लोकांनी एक झुरळ तुमचे काय करू शकता पाहा, अशा कमेंट केल्या आहेत.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये स्फोट झाल्यानंतर घरात धुर झालेलाही पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर खराब झालेली बाग आणि किडे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यामुळं तुमच्या घरातही झुरळ असतील तर चुकूनही असे प्रकार करू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2019 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading