Home /News /lifestyle /

अरे बापरे! 6 सिहिंणीनी सिंहाला घेरलं आणि... जंगलाच्या राजाची केली भयंकर अवस्था; पाहा VIDEO

अरे बापरे! 6 सिहिंणीनी सिंहाला घेरलं आणि... जंगलाच्या राजाची केली भयंकर अवस्था; पाहा VIDEO

सिंहिणींच्या तावडीतून सुटण्यासाठी सिंह (male lion attacked by female lions) जीवाच्या आकांताने ओरडतो आहे.

    मुंबई, 21 मार्च : जंगलचा राजा म्हणजे सिंह (Lion). ज्याला प्रत्येक प्राणी घाबरतो. पण या जंगलच्या राजाचं सिंहिणींसमोर काहीच चाललं नाही. सहा सिहिंणीनी मिळून एका सिंहाची अक्षरश: वाट लावली आहे. सहा जणींनी त्याला घेरलं पकडलं आणि त्याला अक्षरश: फाडलं आहे. सिंहाची अशी अवस्था कधीच पाहिली नसावी किंवा इतका हतबल सिंहसुद्धा कधीच पाहिला नसेल. सोशल मीडियावर (Social media) या सिंहाचा व्हिडीओ (Lion video) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यामध्ये सिंहिणी सिंहाची शिकार करताना दिसत आहेत. सिंह आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडतो आहे. पण सिंहिणी काही त्याला सोडत नाही. व्हिडीओत पाहू शकता, एकूण सहा सिंहिणी दिसत आहेत. सिंह जमिनीवर पडला आहे. एका सिंहिणीने त्याचा पाय पकडला आहे. एकिने तोंड पकडलं आहे तर एक त्याच्या पाठीजवळ आहे, जी त्याच्या शरीरावरील केस काढताना दिसत आहे. तिने सिंहाच्या शरीरावरील बहुतेक केस काढलेले आहेत. यामुळे सिंहाला वेदनाही खूप होत आहेत. हे वाचा - पंख पसरून दोन पायांवर दुडूदुडू पळणारा सरडा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO इतर दोन-तीन सिंहिणी सिंहाच्या शेजारीच बसलेल्या दिसतात. त्या मधून मधून सिंहावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी सिंह त्यांना आपल्या हाताने मारून प्रतिकार करण्याचा दूर लोटण्याचा प्रयत्न करतो. तो या सिंहिणींच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. पण सिंहिणीने त्याला असं पकडून ठेवलं आहे, की त्याची सुटका होणं अशक्यच आहे. त्याने थोडी जरी धडपड केली तरी त्या त्याच्यावरील आपली पकड अधिक मजबूत करतात. ज्यामुळे त्याला अधिक वेदना होतात आणि तो ओरडतानाही दिसतो. हे वाचा - OMG! आगीवर नाही तर 'थप्पड़ मारकर' शिजवलं चिकन; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO एरवी रूबाबदारपणे मिरवणारा आणि इतर सर्व प्राण्यांना घाबरणारा त्यांची शिकार करणारा सिंहाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. इतका हतबल आणि घाबरलेला सिंह कदाचित कुणीच पाहिला नसेल. आता आपली काही सुटका नाही हेसुद्धा त्याला कळून चुकलं आहे.
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या