VIRAL VIDEO! पाद्री यांचा हा धम्माल डान्स पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही

VIRAL VIDEO! पाद्री यांचा हा धम्माल डान्स पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही

तीन दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 2.6 लाखहून अधिक लोकांनी पाहिला. कमेन्टमध्ये अनेकांनी पाद्री यांचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर- प्रसिद्ध कुडुक्कू या गाण्यावर एका पाद्री यांंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे गाणं निविन पौली यांच्या मल्याळम सिनेमा लव्ह अॅक्शन ड्रामामधील आहे. यावर्षी ओनमच्या मुहुर्तावर या गाण्याने एकच धमाल उडवून दिली होती. मंगळवारी अभिनेता निविन पौलीने पाद्री मॅथ्यू यांचा या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत अजून दोन व्यक्ती पाद्रींसोबत नाचताना दिसत आहेत.

नवीन पाउलीने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, 'पाद्री मॅथ्यू किझाचकेचिरिया यांनी त्यांच्या टीमसोबत या गाण्यावर डान्स केला. धन्यवाद.' तीन दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 2.6 लाखहून अधिक लोकांनी पाहिला. कमेन्टमध्ये अनेकांनी पादरी यांचं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Father Mathew Kizhackechira from New Delhi dancing to #Kudukkusong tune with his team. Thank you Father! 🙏😍

A post shared by Nivin Pauly (@nivinpaulyactor) on

न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पाद्री मॅथ्यू म्हणाले की, 'या परफॉर्मन्सचाआधी विचार केला नव्हता आणि प्रसिद्ध होण्याचाही काही विचार नव्हता. पहिल्यापासून परफॉर्मन्सबद्दल काहीच ठरलं नव्हतं. मला हेही माहीत नव्हतं की कोणी माझा व्हिडीओ शूट करतंय. मला याबद्दल तेव्हा कळलं जेव्हा लोकांनी फोन करायला सुरुवात केली. अनेकांनी सांगितलं की माझा डान्स पाहून त्यांना निविन पौलीची आठवण आली.'

कुडुक्कू गाण्याला यूट्यूबवर तुफान प्रसिद्धी मिळाली असून आतापर्यंत 6.7 लाखाहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे.

अन्न चावण्याची योग्य पद्धत कळली तर कधीही होणार नाही पोटाचे आजार!

Research: ...म्हणून विवाहबाह्य संबंधांत पुरुषांपेक्षा महिला असतात जास्त आनंदी

Vastushastra: स्वप्नातही या 7 गोष्टी घरात करू नका, नाही तर...

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First published: September 26, 2019, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading