नितळ त्वचा आणि चमकदार केस; मलायका अरोरानं सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट

नितळ त्वचा आणि चमकदार केस; मलायका अरोरानं सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट

अभिनेत्री म्हणजे महागडे, ब्रँडेड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरत असावेत, असाच आपला समज असतो. पण मलायका अरोरा (Malaika Arora) घरगुती ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करते, जे ती स्वतः तयार करते. कसं ते तिनं सांगितलं आहे,

  • Share this:

मुंबई, 07 फेब्रुवारी : सर्वसामान्यपणे वयाची तिशी पार केल्यावरच महिलांना त्वचेच्या, केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर सुरकुत्या, ब्लॅक हेड्स, पिंपल्स, अॅक्ने, केस गळणं अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) 47 वर्षांची आहे. पण पंचेचाळीशी उलटल्यानंतरही तिचं सौंदर्य (malaika arora beauty) म्हणजे विशीतील तरुणीसारखंच आहे.

अभिनेत्री म्हटलं की महागडे, ब्रँडेड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरत असावी. जे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. असंच तुम्हाला वाटत असेल. तर नाही मलायका कोणतेही महागडे कॉस्मेटिक्स नाहीत तर घरगुती ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करते. मलायका आपली त्वचा सुंदर, नितळ कशी ठेवते, केस चमकदार कशी करते, याचं सिक्रेट तिनं सांगितलं आहे.'फिल्मी न्यूज जे'च्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.. ज्यामध्ये मलायका आपल्या सौंदर्याचं सिक्रेट सांगताना दिसते.

अंघोळ करताना कॉफी-शुगर-ऑईल बॉडी स्क्रब

मलायका अंघोळ करताना नियमित लुफा आणि प्युबिक स्टोन वापरते. याशिवाय ती स्वतः तयार केलेल स्क्रब लावते. कॉफी पावडर, ब्राऊन शुगर आणि तेलाचा वापर करून ती हा बॉडी स्क्रब तयार करते. ब्राऊन शुगर नसेल तर तुम्ही व्हाइट शुगर तुम्ही बारीक करून वापरू शकता.असं तिनं सांगितलं. तेलामध्ये तुम्ही खोबरेल किंवा बदाम कोणतंही तेल वापरू शकता.

हे वाचा - 'पहिल्या प्रेग्नन्सीत जे झालं ते आता नाही...', प्रसूतीआधी करीना कपूर झाली व्यक्त

या तीन सामग्री एकत्र कराव्यात आणि त्वचेवर हलक्या हातानं गोलाकार पद्धतीनं चोळावं. त्यानंतर पाण्यानं धुवून त्वचेवर मॉईश्चरायइर लावावं. यामुळे त्वचा मुलायम होते, त्वचेवरील मृत पेशी दूर होतात.

पिंपल्स, अॅक्नेसाठी दालचिनी फेसपॅक

बदलतं वातावरण, ऑईली स्किन यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, ब्रेक आऊट, अॅक्ने येतात. यावेळी मलायका अर्धा टिस्पून दालचिनी पावडर आणि एक टिप्सून मध, एक टिप्सून लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावते. हा पॅक ओठ आणि डोळ्यांजवळ लावू नये, असा सल्ला तिनं दिला आहे. 8 ते 10 मिनिटानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा आणि मॉईश्चरायझर लावा.

केसांसाठी स्पेशल हेअर ऑईल

मलायका तीन तेल एकत्र करून वापरते. यासाठी ती  खोबरेल तेल, एरंडेल तेल आणि ऑलिव्ह ऑईल समप्रमाणात घेत. तिन्ही तेल एकत्र करून एका काचेच्या बरणीत किंवा बाटलीत घ्यावं आणि त्यामध्ये थोडे मेथीचे दाणे आणि कडीपत्ता टाकावा. झाकण बंद करून काही दिवस हे सर्व एकत्र होऊ द्यावं.

हे वाचा - लग्नाआधीच सुरू झाला सई-आदित्यचा रोमान्स; 'माझा होशील ना मधील' Romantic Video

हे तेल तुम्हाला दीर्घकाळासाठी तयार करून ठेवता येऊ शकतं. जेव्हा हवं तेव्हा आवश्यक तितकं तेल घेऊन केसांना लावून हलक्या हातानं मसाज करावा. 45 मिनिटांनी केस धुवावेत. आठवड्यातून एकदा जरी हे ते वापरलं तरी तुमचे केस दाट होतील आणि सुदंर होती केसगळतीही कमी होईल, असं मलायका म्हणाली.

दिवसाची सुरुवात स्पेशल ड्रिंकनं

सौंदर्यासाठी फक्त वरवर उपाय करून नाही तर शरीराच्या आतूनही काळजी घेण्याची गरज आहे. मलायका आपलं शरीर आतून शुद्ध ठेवण्यासाठी आणि नीट पचन व्हावं यासाठी दररोज सकाळी उठल्यावर एक खास ड्रिंक पिते. रात्री झोपताना ती मेथीचे दाणे आणि जिरं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवते. सकाळी उठल्यावर मेथी आणि जिरं गाळून हे पाणी ती पिते.

Published by: Priya Lad
First published: February 7, 2021, 9:26 PM IST

ताज्या बातम्या