Home /News /lifestyle /

कोरोना पॉझिटिव्ह मलायका अरोराने शेअर केली पोस्ट; प्रकृतीबाबत दिली माहिती

कोरोना पॉझिटिव्ह मलायका अरोराने शेअर केली पोस्ट; प्रकृतीबाबत दिली माहिती

कोरोना पॉझिटिव्ह अर्जुन कपूर (arjun kapoor) पाठोपाठ मलायका अरोरानेदेखील (malaika arora) आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

  मुंबई, 07 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला (Malaika Arora) कोरोनाव्हायरसचा (coronavirus) संसर्ग झाला आहे. तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरदेखील (arjun kapoor) कोरोना संक्रमित आहे. अर्जुनने आपल्या सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. आता अर्जुनपाठोपाठ मलायकानेदेखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तिनं स्वत: दिली आहे. मलायका सध्या डान्स रिअॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर्समध्ये जज म्हणून दिसते. या कार्यक्रमाच्या सेटवर  7 ते 8 जण कोरोना संक्रमित झाल्याचं समजलं आणि आता मलायकादेखील कोरनना संक्रमित आहे. तिला कोरोना झाल्याचं निदान रविवारी झालं. दरम्यान आज तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
  View this post on Instagram

  🙏😷

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

  मलायका म्हणाली, "माझा कोरनाव्हायरस टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या प्रकृतीबाबत तुम्हाला माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. मी ठिक आहे आणि माझ्यामाध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. तसंच मी डॉक्टरांनी दिलेल्या नियमांचं, सल्ल्याचं पालन करते आहे. कोरोना प्रोटोकॉलनुसार मी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. तुम्ही सर्वदेखील आपल्या घरी राहा आणि सुरक्षित राहा असं आवाहन मी करते" हे वाचा - प्रेग्नंट करीना कपूरला भेटली होती कोरोनाग्रस्त मलायका अरोरा; PHOTO VIRAL मलायकाला कोरोनाचं निदान होताच तिचे काही फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. मलायका काही दिवसांपूर्वीच प्रेग्नंट करीना कपूरलादेखील भेटली होती. तिनं आपल्या गर्ल्स गँगसह फोटोशूटही केलं केलं होतं आणि हे फोटो तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते.
  View this post on Instagram

  🙏🏽

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

  मलायकाच्या आधी अर्जुन कपूरने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. अर्जुनमध्येदेखील कोरोनाची लक्षणं नाहीत. तोदेखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाइन आहे. हे वाचा - एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पूर्ण करतेय सुशांतचं स्वप्नं; पाहा VIDEO मे महिन्यातच बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या स्टाफला कोरोना झाला होता. बोनी कपूर यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली होती. दरम्यान आपल्यापैकी कुणीही घराबाहेर गेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Malaika arora

  पुढील बातम्या