Home /News /lifestyle /

बॉयफ्रेंड अर्जुन कपूरनंतर अभिनेत्री मलायका अरोरालाही कोरोना

बॉयफ्रेंड अर्जुन कपूरनंतर अभिनेत्री मलायका अरोरालाही कोरोना

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरादेखील (Malaika Arora) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे.

  मुंबई, 06 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) पाठोपाठ त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोरादेखील (Malaika Arora) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. अर्जुन आणि मलायका दोघांनीही कोरोनाची लागण झाली आहे. रविवारीच दोघांनाही कोरोना असल्याचं समोर आलं. मलायका अरोराचा शो 'इंडियाज बेस्ट डान्सर्स'च्या सेटवर 7 ते 8 जण कोरोना संक्रमित असल्याचं समोर समजलं आणि आता मलायकादेखील कोरोना संक्रमित आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना मलायकाने आपल्यालाही कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. मलायका म्हणाली, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणं नाही, त्यामुळे मी होम क्वारंटाइन आहे. मी लवकरच बरी होईन आणि पुन्हा मजबूत बनेन" तर मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुनने स्वत: आपल्या सोशल मीडियावर आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली.
  View this post on Instagram

  🙏🏽

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

  अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. ज्यामध्ये त्याने आपल्याला कोरोना असल्याचं सांगितलं आहे. अर्जुन म्हणाला, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली हे तुम्हाला सांगणं माझी जबाबदारी आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही आणि मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पूर्णपणे बरा होईपर्यंत घरातच आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या आरोग्याबाबत ही महिती देत राहेन. अशा अनिश्चित स्थितीत माणुसकीच या व्हायरला हरवेल असा विश्वास मला आहे" हे वाचा - मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोना; घरातच झाला क्वारंटाइन फिल्म निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर. मे महिन्यातच बोनी कपूर यांच्या घरातील स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. त्यानंतर बोनी कपूर यांनी स्टेटमेंट जारी केलं होतं. मी आणि माझी मुलं ठिक असल्याची माहिती त्यांनी दिली होती. तसंच लॉकडाऊननंतर आमच्यापैकी कोणीही घराबाहेर गेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यांचा स्टाफने कोरोनाव्हायरसवर मातदेखील केल्याची त्यांनी माहिती दिली होती. हे वाचा - Covid-19 उलटतोय! मुंबईपाठोपाठ आणखी एका शहरात कोरोनामुक्त रुग्णाला पुन्हा संसर्ग तर काही दिवसांपूर्वीच मलायका ज्या अपार्टमेंटमध्ये राहते त्या ठिकाणचे काही रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ते अपार्टमेंटही मुंबईमहापालिकेनं सील केलं होतं. दरम्यान आता अर्जुन आणि मलायका दोघंही कोरोनाग्रस्त आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Arjun kapoor, Coronavirus, Malaika arora

  पुढील बातम्या