समुद्रकिनारचे हे Hot फोटो शेअर करत मलायकाने दिली नवी ट्रॅव्हल गोल्स, पाहा खास फोटोशूट

समुद्रकिनारचे हे Hot फोटो शेअर करत मलायकाने दिली नवी ट्रॅव्हल गोल्स, पाहा खास फोटोशूट

मलायकाने मालदीवमध्ये केलेल्या एका शूटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समुद्रकिनारी शूट केलेल्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला नसला तरच नवल!

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून तिच्या मालदीव व्हेकेशनमुळे चर्चेत आहे.  मलायका Malaika Arora तिच्या गर्ल्स गँगसोबत मालदीवला सुट्टी एंजॉय करायला गेली होती. त्या वेळचे या मैत्रिणींच्या मजेमजेचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पण मलायकाने मलादीवमध्ये नुसती मजा केली असं नाही, तर तिने तिथे काही प्रोफेशनल कमिटमेंट्सही पूर्ण केल्या. मलायकाने मालदीवमध्ये केलेल्या एका शूटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समुद्रकिनारी शूट केलेल्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला नसला तरच नवल! एका ट्रॅव्हल मॅगझिनसाठी मलायकाने हे फोटो शूट केल्याचं समजतं.  याचे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

 

View this post on Instagram

 

Producer: @aindrilamitra Photographer: @rohanshrestha Assistant Photographers: @sheldon.santos & Homyar Phiroze Stylist: @tanghavri Assistant stylist: @nidhijeswani Hair & Makeup: @mehakoberoi Video Producer: @aditya_mehrotra_ Location: @thewestinmaldives Outfit: @wendellrodricks PR Partner: @bazinga_ent @travelandleisureindia

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकाचे हे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरणार नाही. याशिवाय तिच्या मैत्रिणींनीही मालदीवचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

ब्लॅक ड्रेसला एका बाजूने असलेली मोठी स्लिट आणि पार्श्वभूमीवर निळा समुद्र.. मलायकाच्या या फोटोंनी म्हणूनच कमाल केली आहे. रोहन श्रेष्ठ या फोटोग्राफरने हे शूट केलं आहे.

मलायकाने मालदीवपूर्वी न्यूयॉर्कच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर मालदीवच्या फोटोंनी सोशल मीडिया गाजवला. आता याच मालदीवचं हे फोटोशूट समोर आलं आहे.

फिटनेस गोल देणारी मलायका बॉलिवूडच्या कोणत्याही सिनेमाचा भाग नाही. मात्र ती सध्या परफेक्ट ट्रॅव्हल गोल्स सुद्धा देत आहे.

 

View this post on Instagram

 

Jus lounging around ...... #madives#verycasually

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

ट्रॅव्हल अँड लीजर मॅगझीनसाठी हे फोटोशूट केलं गेलं आहे.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 2, 2019, 7:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading