मुंबई, 06 ऑगस्ट : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) फिटनेससह तिच्या सौंदर्यासाठीदेखील तितकीच प्रसिद्ध आहे. तिची त्वचा तिच्या वयालाही मात देते. तिच्या ग्लोइंग आणि रिंकल फ्री त्वचा पाहून कुणालाही तिच्या वयाचा अंदाजा येणार नाही. मलायका 46 वर्षांची आहे. तिला 17 वर्षांचा मुलगाही आहे. मात्र तरीही ती एखाद्या तरुणीसारखीच दिसते. तिच्या या सौंदर्याचं नेमकं सिक्रेट काय आहे याचा प्रश्न प्रत्येकाला पडतो.
मलायका आपल्या आहाराची काळजी घेते, याशिवाय आपल्या त्वचेसाठी ती जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर करते. नुकतंच मलायकाने नॅच्युरल ब्युटी कशी मिळवावी याबाबत आपलं ब्युटी सिक्रेट शेअर केलं आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. व्हिडीओमध्ये तिनं म्हटलं आहे की ती आपल्या त्वचेसाठी ताज्या कोरफडीचा वापर करते, जेणेकरून ती तरुण आणि ग्लोइंग दिसेल.
मलायका म्हणाली, "जगातील कित्येक जण त्वचेच्या समस्यांमुळे हैराण आहे. प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. काही जणांची त्वचा ऑयली असते तर काही जणांची ड्राय, तर काही जणांची अॅक्ने प्रोन असते. माझी त्वचा खूप संवेदनशील आहे. त्यामुळे मला माझ्या त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. मी त्याच ब्युटी प्रोडक्टचा वापर करते ते माझ्या त्वचेला सूट होतात. त्वचेसाठी चुकीचे प्रोडक्ट वापरल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं"
हे वाचा - करायचं होतं एक झालं भलतंच! रोमँटिक प्रपोजने लावली आग; पाहा PHOTO
"मी माझ्या त्वचेसाठी एका नैसर्गिक घटकाचा वापर करते आणि ते म्हणजे माझ्या घरच्या बागेरतील कोरफडीचा गर. ताज्या कोरफडीचा दर प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी चांगला आहे, त्यामुळे कुणीही हे वापरू शकतं. कोरफड घेऊन त्याच्या आतील गर काढा आणि तो चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावून ठेवा. काही वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवा आणि चेहऱ्यावर चांगलं मॉईश्चरायझर लावा. यामुळे दिवसभर तुमची त्वचा ताजी, टवटवीत आणि मुलायम राहेल", असं मलायकाने सांगितलं.
हे वाचा - मॉलमध्ये शॉपिंग करताना कोरोनाला कसं दूर ठेवाल? तज्ज्ञांनी दिला सल्ला
कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. कोरफडीचा गर खूप फायदेशीर आहे. सौंदर्य खुलवण्यासाठी कोरफडीचा अनेक प्रकारे वापर करता येतो. यामधील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई त्वचेला तरुण ठेवण्यात मदत करतात. त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. स्किन टॅनची समस्या असल्यासही कोरफडीच्या गराचा वापर करून टॅन दूर करता येतं.