अभिनेत्री मलायका अरोरा कोरोनामुक्त; व्हायरसला हरवल्यानंतर मांडला आपला अनुभव

अभिनेत्री मलायका अरोरा कोरोनामुक्त; व्हायरसला हरवल्यानंतर मांडला आपला अनुभव

अभिनेत्री मलायका अरोराने (malaika arora) 15 दिवस कोरोनाव्हायरशी (coronavrirus) लढा दिला.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने  (Malaika Arora) कोरोनाव्हायरसवर  (Coronavirus) यशस्वीरित्या मात केली आहे. तिनं आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मलायकाने ही माहिती दिली आणि आपला अनुभवही मांडला आहे. 15 दिवसांत मलायकाने कोरोनाला हरवलं आहे.

मलायकाने इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला आहे. मलायकाच्या चेहऱ्यावर मास्क आणि हातात कॉफी मग आहे. यासह तिनं भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. कित्येक दिवस आपल्या रूममध्ये राहिलेल्या मलायकाने दीर्घ श्वास घेतला आहे. तिनं आपला आनंद व्यक्त केला आहे.

OUT AND ABOUT असं म्हणत मलायकाने आपल्या पोस्टची सुरुवात केली आहे. मलायका म्हणाली, "अखेर मी माझ्या खोलीतून कित्येक दिवसांनंतर बाहेर आले. स्वत:मध्येच एक प्रवास केल्यासारखं वाटतं आहे. कमीत कमी वेदना आणि समस्यांसह मी या व्हायरसवर मात केली"

हे वाचा - बालासुब्रमण्यम यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; मात्र अद्यापही व्हेंटिलेटरवर

"वैद्यकीय सल्ला देणारे डॉक्टर्स, वारंवार मार्गदर्शन करणारी बीएमसी आणि मला आधार देणारं माझं कुटुंब या सर्वांचे मी आभार मानते. माझ्या या वाईट परिस्थितीत तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी जे केलं, त्यासाठी मी शब्दातही धन्यवाद नाही मानू शकत. तुम्ही सर्व सुरक्षित राहा आणि स्वत:ची काळजी घ्या", असंही मलायका म्हणाली.

हे वाचा - 106 वर्षांच्या आजीपुढे हरला कोरोना, डिस्‍चार्ज मिळताच चेहऱ्यावर फुललं असं हसू

बॉयफ्रेंड अर्जुन कपूरपाठोपाठ मलायकाला कोरोनाची लागण झाली होती. 6 सप्टेंबरला तिला कोरोनाचं निदान झालं. 7 सप्टेंबरला तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं. मलायका अरोराचा शो 'इंडियाज बेस्ट डान्सर्स'च्या सेटवर 7 ते 8 जण कोरोना संक्रमित झाले होते, त्यानंतर मलायकाचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मलायकामध्ये लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे ती होम क्वारंटाइन होती. घरीच तिच्यावर उपचार सुरू होते.

Published by: Priya Lad
First published: September 20, 2020, 5:19 PM IST

ताज्या बातम्या