थंडीत त्वचेवर लावा दुधाची साय, 5 समस्यांपासून होईल सुटका

थंडीत त्वचेवर लावा दुधाची साय, 5 समस्यांपासून होईल सुटका

कोरड्या त्वचेपासून सुटका आणि मुलायम, सुंदर, तजेलदार त्वचेसाठी करून पाहा हे घरगुती सोपे उपाय.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर: दुधाच्या सायीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. अनेकांना दुधावरची साय म्हटलं की नाक मुरडली जातात. पण दुधावरच्या सायीचे आपल्या त्वचेला होणारे फायदे तुम्ही वाचलेत तर नक्की फायदा होण्याची शक्यता आहे. थंडीमध्ये आपल्या कोमल त्वचेची काळजी घेणं जास्त कठीण होतं. त्वचा अधिक कोरडी होते. काहीवेळा त्वचेवर लाल चट्टे येतात किंवा थंडीमुळे त्वचा फुटते. काहीवेळा आपल्या त्वचेची काळजी घेण्याइतका वेळही आपल्याकडे नसतो. थंडीत त्वचेची काळजी घेण्याचा एक घरगुती खास उपाय तुम्ही करू शकता. या उपायमुळे तुमची त्वचा मुलायम कोमल होऊ शकते.

तुमच्या त्वचेवर असलेले डाग मुरुम घालवून तुम्हाला सुंदर, कोमल आणि मुलायम त्वचा हवी असेल तर दुधाची साय तुम्ही चेहऱ्याला लावू शकता त्यामुळे तुमची त्वचा खराब होणार नाही.

त्वचेवर तुम्ही रोज सकाळी दुधाची साय नुसती लावली तरीही तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होते. सायीमध्ये स्निग्ध असल्यामुळे स्क्रिनला मॉईचर करण्यासाठी मदत होते. परंतु ज्यांची त्वचा तेलकट आहे अशांनी नुसती साय लावू नये. अति तेलामुळेही त्वचेवर मुरुम किंवा फोड येतात.

आता 4 लाखांतही तुम्ही सुरू करू शकता दुप्पट नफा देणारा 'हा' व्यवसाय

रोज दुधाच्या सायीमध्ये साखर घालून खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक ते स्निग्ध मिळण्यास मदत होते.

तुम्ही रोज दुधाची साय, थोडी हळद, चण्याचं पीठ, चंदन पावडर असं एकत्र करुन लावू साबणाऐवजी त्वचेला लावू शकता. त्यामुळे त्वचा उजळते, कोमल होण्यास मदत होते.

ओठ थंडीमुळे फुटले असतील तर तूप किंवा साय लावावी त्यामुळे ओठ कोरडे पडत नाहीत.

दुधाची साय लिंबाच्या रसात मिसळून लावल्यास तुमच्या त्वचेवरील मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. सायीचा वापर तुम्ही रोज फेसस्क्रब म्हणूनही करू शकता. त्यामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन असल्यानं चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यापासून रोखतात.

डोळ्यांखालची काळी वर्तुळं कशी कमी करायची?

चेहऱ्याचं सौंदर्य आकर्षक डोळ्यांमध्येच दडलेलं असतं. पण डोळ्यांखालील डार्क सर्कल्स अधिकाअधिक वाढत गेले तर चेहऱ्याचं सौंदर्यच नाहीसं होतं. डार्क सर्कल्सपासून सुटका हवी असेल तर काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय करणं फार गरजेचं आहे.

1. काकडी शरीरासाठी थंड असते. ती खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत सुद्धा होते. काकडीचे छोटे छोटे स्लाईस करुन 20 मिनिट डोळ्यांवर ठेवले तर डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतात. त्याचबरोबर थकलेल्या डोळ्यांना आरामसुद्धा मिळतो.

पोस्ट ऑफिसनं सुरू केली नवी सर्व्हिस, आता घरी बसल्याच करा पैशांचा व्यवहार

2. काकडी आणि लिंबाचा रस एकत्रित करून डोळ्याखाली 20 मिनिटांपर्यंत लावून ठेवावा. त्यामुळे डोळे अधिकच आकर्षक वाटतील.

3. बटाट्याचे छोटे स्लाईस किंवा कच्च्या बटाट्याचा रससुद्धा डोळ्याभोवतीचे डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करतात.

4. चेहरा अधिकाधिक खुलून दिसावा यासाठी तुम्ही बदामाचा वापरसुद्धा करू शकता. 1 चमचा बदाम पेस्ट आणि दूध यांचं एकत्रित मिश्रण डोळ्यांखाली लावलं तर नक्कीच डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होऊन चेहऱ्याचं सौंदर्य खुलून दिसेल.

5. एक चमचा गुलाब पाणी, दोन मोठे चमचा दही आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस एकत्रित करुन ते मिश्रण डोळ्यांखाली लावावं. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवून साफ पुसावं. त्यामुळे डार्क सर्कल्सपासून सुटका होण्यास मदत होईल.

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 09:42 PM IST

ताज्या बातम्या