मुंबई, 31 डिसेंबर : आता नवीन वर्ष (New Year 2021) येण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह जाणवू लागला आहे. कोरोनाच्या साथीचं (Corona Pandemic)सावट आहेच; पण लस आल्यानं खूप मोठा दिलासाही मिळाला आहे. तसंच नवीन येणारं वर्ष चांगलं जाईल, अशी आशाही सर्वांना आहे. त्यामुळे जुन्या वर्षातील कटू आठवणी बाजूला ठेवून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण उत्साहानं सज्ज होत आहेत.
पार्ट्या, कपडे, मेकअप, ट्रिप्स यांच्या चर्चा रंगत आहेत. अनेकांनी पर्यटनस्थळी धाव घेतली आहे. कपडे, मेकअप यांच्या नवीन थीम्स ट्रेंड होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटी आपल्या थीम्स शेअर करत आहेत, त्यांना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सेलेब्रिटीचे ट्रेंड फॉलो होत आहेत.
आपली सर्वांची आवडती हॉलिवूडवर राज्य करणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा मेकअप लूक तुम्ही फॉलो करू शकता. या फोटोत ती एकदम स्टनिंग दिसत आहे.
View this post on Instagram
हॉलिवूड स्टार जेनिफर लोपेझ हिनं इन्स्टाग्रामवर आपली लिपस्टिक शेड, आयलायनर, स्कीन कलर याबाबत पोस्ट आणि फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
तुम्हाला नवीन वर्षाच्या पार्टीला तिची स्टाईल फॉलो करायची असेल तर, ग्राफिक आयलायनरचा वापर करा. त्यावर थोडासा ग्लिटर लावा, एक वेगळाच लूक येईल.
हे वाचा - इथे मिळतो सोन्याचा बर्गर, खाण्यासाठी लोक लावत आहेत रांगा
कायली जेनरनं पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या आयलायनरचा वापर करून आपली हटके स्टाईल कायम ठेवली आहे.
View this post on Instagram
न्यूड शेडच्या लिपस्टिकचा वापरही उठून दिसत आहे. या मेकअप थीमचा वापर करून तुम्ही नवीन वर्षाच्या पार्टीत सहभागी झालात, तर उठून दिसाल.
हे वाचा - Baby bump सह फॅशन मॅगझिनवर झळकली अनुष्का; Bold फोटोशूटच्या स्वतःच पडली प्रेमात
हॉलिवूड सोशल मीडिया स्टार किम कार्दाशियन आपल्या अफलातून स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तिनं आपल्या ब्युटी प्रॉडक्टसचा वापर करण्याची शिफारस केली असून, फ्लटरी आयलॅशेस, त्याला मिळतीजुळती लिपस्टिक शेड असा तिचा नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीतील लूक असणार आहे.
View this post on Instagram
तुम्हाला यात आणखी काही वेगळेपण आणायचे असेल तर ऑक्सब्लड रेड लिपस्टिक शेडचा वापर करा, असा तिचा सल्ला आहे.
2020 हे वर्ष कोरोनाच्या साथीमुळं स्वच्छता, वैयक्तिक काळजी यावर भर देण्यात गेलं, पण नवीन वर्षात सौंदर्य प्रसाधनांमध्ये ग्लिटर (Gliter)म्हणजे चमक या घटकाला अधिक प्राधान्य मिळणार असल्याचं दिसत आहे. बोल्ड आयब्रोज, शिमरी म्हणजे चमकदार आयशॅडो आणि न्यूड शेड लिपस्टिक यावर मेकअपमध्ये भर असल्याचं दिसत आहे.