मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हा सुपर फॉर्म्युला वापरून केस होतील घनदाट; बांधणंही होईल कठीण

हा सुपर फॉर्म्युला वापरून केस होतील घनदाट; बांधणंही होईल कठीण

काहीवेळा आपल्या वाईट सवयींमुळे केस गळायला लागतात.

काहीवेळा आपल्या वाईट सवयींमुळे केस गळायला लागतात.

केस चांगले वाढावेत (Hair Growth) यासाठी फक्त 4 पदार्थ नियमीत खाल्ल्यास केसांच्या सगळ्या समस्या (Hair Problem) संपून जातील.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट :  केसांत कोंडा (Dandruff) झाला, केस तुटत असतील तर, त्यामुळे केस गळायलाही (Hai Fall) लागततात. एवढच काय तर, कोणतंही आजारपण किंवा औषधं  (Medicine) सुरू असतील तरी केस कमी होतात. त्यामुळे केसांची सगळ्यात मोठी समस्या (Hair Problem) म्हणजे केस गळणे. थोड्याफार केसांच्या गळतीकडे दुर्लक्ष करता येतं. मात्र, केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर, टक्कल (Bald) पडण्याची भीती असते. केस कमी झाले तर, आपली आवडती हेअर स्टाईल (Hair Style) देखील करता येत नाही किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आवडते कपडे घातल्यानंतर देखील आपल्या केसांकडे लक्ष जात राहतात.

केस गळणं हे अनेक कारणांमुळे होऊ शकतं. कधीकधी केसांच्या त्वचेचा आजार हे देखील एक कारण असू शकतं. काहीवेळा आपल्या वाईट सवयींमुळे केस गळायला लागतात. केस स्वच्छ न धुतला मुळे, केसांसाठी आवश्यक असणारा आहार न घेतल्यामुळे देखील केस गळायला लागतात. त्यामुळे केस चांगले राहण्यासाठी त्यांची तेवढीच काळजी घेणं आवश्यक असतं. चांगल्या केसांसाठी काही सवयी लावून पाहा केस नक्कीच वाढतात.

कोरफड

योग्य आणि नियमित पद्धतीने कोरफडचा वापर केला तर, केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते. कारण कोरफडमध्ये केसांसाठी आवश्यक असणारे न्यूट्रिशन असतात. ज्यामुळे केस मॉश्चराइज राहतात. कोरफडच्या पानांचा ताजा गर काढून त्याची पेस्ट तयार करावी आणि नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून स्कॅल्पसह संपूर्ण केसांना लावावी. 1 तासानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत या उपायाने नक्कीच फायदा होतो.

(अभिनेत्री भाग्यश्रीसाठी मटार आहेत ‘प्रोटीन रत्न', या कारणामुळे रोज खा हिरवे दाणे)

आवळा खा

चांगल्या केसांसाठी आवळा खायला सुरुवात करा. केसांच्या समस्यांमध्ये आवळा खाण्याने फायदा होतो. नियमितपणं रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर, केस गळण्याचा त्रास लवकर कमी होतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. याशिवाय आवळा खाण्याने कोलेजनची निर्मिती देखील वाढायला सुरुवात होते.

(हाडं मजबूत करतात हे 6 पदार्थ; संधिवात, फ्रॅक्चर, कॅन्सरची राहणार नाही भीती)

ऑइल मसाज

केसांना ऑइल मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ज्यामुळे केस हेल्दी राहतात. नारळाचं तेल, राई तेल, जोबा ऑईल असे तेल लावल्याने फायदा होऊ शकतो. तेल थोडंसं कोमट करून टाळूला चांगला मसाज करावा. त्यानंतर गरम पाण्यामध्ये टॉवेल बुडवून पाणी पिळून आपल्या केसांना हा टॉवेल बांधावा. यामुळे तेल केसांमध्ये चांगल्याप्रकारे शोषलं जातं.

(ऑनलाईन अभ्यासामुळे डोळे होतील खराब; अशी घ्या मुलांची काळजी)

आहाराकडे लक्ष द्या

केस चांगले होण्यासाठी केसांच्या काळजी बरोबर आहाराकडे लक्ष द्यावं. त्यासाठी चांगला आहार असायला हवा. याकरता आहारामध्ये व्हिटॅमिन बी, सी, झिंक, आयर्न आणि कॉपर असणारे घटक असायला हवेत. याशिवाय भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं तरच केस घनदाट, मुलायम आणि मजबूत होऊ शकतात.

First published:

Tags: Home remedies, Lifestyle, Woman hair