• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • हनिमूनचा प्रत्येक क्षण संस्मरणीय करा; 'या' गोष्टींची काळजी घेतली तर पत्नीही खूश

हनिमूनचा प्रत्येक क्षण संस्मरणीय करा; 'या' गोष्टींची काळजी घेतली तर पत्नीही खूश

एकूणच नीट नियोजन केलंत तर लग्न आणि हनिमून या गोष्टींच्या तुमच्यासाठी कायमच्या चांगल्या आठवणी बनून राहतील.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला संस्मरणीय क्षण असतो. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस हे अनेकांच्या मनात कायमस्वरूपी कोरले जात असतात. हनिमून (Honeymoon) हवा तसा , हव्या त्या ठिकाणी झाला असेल, तर आयुष्यभर ते क्षण आपल्या अगदी मनात राहतात आणि आनंद देत राहतात. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात मुलगा-मुलगी दोघेही नोकरीत व्यग्रस असणारे असतील, तर एकमेकांसाठी वेळ काढणं नंतर जरा अवघड होतं. अशा वेळेस हनिमूनचं नीट प्लॅनिंग (Planning) करणं गरजेचं आहे. याबद्दलच्याच काही टिप्स येथे देत आहोत. ‘आज तक’ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. तब्येत लक्षात घेऊ प्लॅनिंग करा : लग्नाआधीची आणि लग्नातली धावपळ याचा परिणाम तब्येतीवर होतोच. अशा वेळेस तब्येत लक्षात घेऊनच हनिमूनचं प्लॅनिंग करा. तुम्ही जिथे जाणार आहात, त्या हवेचा तुम्हाला त्रास तर होणार नाही ना, तिथे जाण्यासाठी काही लस घेणं आवश्यक आहे का याची पूर्ण माहिती घ्या. त्या ठिकाणच्या काही खास गाइडलाइन्स आहेत का याचा पूर्ण विचार करा. जिथे जाण्याचं ठरवत आहात त्या ठिकाणाची सगळ्या प्रकारची पूर्ण माहिती आधीच घ्या. सीझन लक्षात घेऊनच बुकिंग : (Booking as per Season) आपला हनिमून एखाद्या अगदी खास ठिकाणी व्हावा असं तुमचं स्वप्न असेल, तर त्याचं प्लॅनिंग तुम्ही केलं असेलच; पण तुम्ही जाणार आहात तो सीझन किंवा ऋतू तिथं बाहेर फिरण्यासाठी योग्य आहे का याचाही विचार करा. त्याप्रमाणेच तुमच्या लग्नाचीही तारीख ठरवा. उदाहरणार्थ पावसाळ्यात प्रवास अवघड असतो. तसंच अनेक पर्यटन स्थळंही बंद असतात. अशा वेळेस हनिमून प्लॅन केला तर फिरण्याची मजा तुम्ही घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचं लग्न आणि त्यानंतर हनिमूनच्या तारखा पूर्ण विचार करून प्लॅन करा. म्हणजे दोन्हीचा आनंद तुम्हाला विनाअडथळा लुटता येईल. बजेटकडेही लक्ष द्या : (Budget) आपला हनिमून संस्मरणीय व्हावा असंच प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात; पण यासाठी हनिमूनवर अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला पाहिजे असं नाही. कित्येक जण तर संपूर्ण बचत हनिमूनवर खर्च करायला तयार असतात; पण याची काहीच गरज नाही. थोडं नीट नियोजन कराल तर तुमच्या बजेटमध्ये लग्न आणि हनिमून अगदी तुम्हाला हवं तसं होऊ शकतं. तुम्हाला फिरण्यावर, ट्रिपवर नेमका किती खर्च करायचा आहे ते आधीच ठरवा आणि तेवढाच खर्च करा. प्रवासात काळजी घ्या (Travel Precaution) : प्रवासाचंही योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. प्रवासात अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. विमानानं जाणार असाल तर तुमच्याकडे असलेला वेळ, विमानांच्या वेळा, फ्लाइट बदलण्याची वेळ आली तर त्यासाठी किती वेळ लागेल हे सगळं नीट पाहून ठेवा. फ्लाइट बदलायची वेळ आली तर टर्मिनलमधलं अंतरही लक्षात घ्या. जो प्रवास तुमच्या आवाक्यात आहे, ते पाहून तसंच नियोजन करा. हे ही वाचा-काळेभोर दाट सिल्की केस चारचौघीत मिरवायचेत? हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा सोशल मीडियापासून दूर राहा (Distance From Social Media) : हनिमून म्हणजे तुमच्या पार्टनरबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं. या काळात सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहा. तुमचे अपडेट सोशल मीडियावर टाकून त्यावरच्या प्रतिक्रिया बघण्यात वेळ घालवू नका. काही जणांसाठी सोशल मीडियापासून दूर राहणं खूप अवघड आहे; पण नवं नातं तयार होताना हे गरजेचं आहे. त्यामुळे फोन अगदी मर्यादित स्वरूपातच वापरा. हनिमूनमध्ये आपल्या पार्टनरसोबतचे ते काही खास क्षण अनुभवण्यासाठी अनेक जण आपल्या रूमच्या बाहेरच पडत नाहीत; पण तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जवळपासची चांगली ठिकाणं बघा. त्यातूनही वेगळा आनंद मिळेल. थंडीच्या दिवसांत हनिमूनसाठी जाणार असाल तर उन्हात दिवसभर फिरणं चांगलं वाटतं; पण त्याचा त्रासही होऊ शकतो. बाहेर जाताना सनस्क्री वापरा. सतत पाणी पीत राहा. तब्येतीची काळजी घ्या. एकूणच नीट नियोजन केलंत तर लग्न आणि हनिमून या गोष्टींच्या तुमच्यासाठी कायमच्या चांगल्या आठवणी बनून राहतील.
  First published: