मुलांच्या मनातील 'त्या' प्रश्नांची उत्तरं; समजून घ्या कोणत्या वयात, कसं द्यावं लैंगिक शिक्षण

मुलांच्या मनातील 'त्या' प्रश्नांची उत्तरं; समजून घ्या कोणत्या वयात, कसं द्यावं लैंगिक शिक्षण

अनेक पालकांना या विषयावर मुलांशी मनमोकळेपणाने बोलावं असं वाटतं मात्र ते कशा पद्धतीने हे समजत नाही.

  • Last Updated: Aug 19, 2020 11:04 PM IST
  • Share this:

भारतीय समाजात आजही लैंगिक शिक्षणाकडे संकुचित दृष्टीने पाहिलं जातं. टीव्हीवर येणाऱ्या गर्भनिरोधक साधनांच्या जाहिराती पाहून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, वाढत्या वयाबरोबर जर त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही तर ते वाममार्गावर जातात. मुलांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी पालकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे. अनेक पालक सकारात्मक पावलं उचलतात, पण त्यांच्या समोरही प्रश्न असतो की मुलांशी लैंगिक संबंधांविषयी मनमोकळेपणाने कसं बोलावं, कशा पद्धतीने त्यांना याविषयी शिक्षण द्यावे. चला तर जाणून घेऊ याविषयीच्या काही महत्वपूर्ण टिप्स.

वयाप्रमाणे द्या लैंगिक शिक्षण

मुलं वाममार्गाला जाऊ नयेत म्हणून त्यांना योग्य वयातच लैंगिक शिक्षण द्यायला हवं. तज्ज्ञांच्या मते योग्य वयात आणि योग्य पद्धतीने मुलांना लैंगिक शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. याची सुरुवात मुलं चार किंवा पाच वर्षांची असतात तेव्हापासून करता येऊ शकते. लहान वयातील मुलांना त्यांच्या गुप्तांगाची माहिती द्या. त्यांना त्याची नावे आणि त्याविषयी पूर्ण माहिती द्या. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा ते शिकवा.

आठ वर्षांच्या मुलांसाठी

आठ वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेली मुले आजकाल खूप समजूतदार व्हायला लागली आहेत. टीव्ही, इंटरनेट पाहून त्यांना अनेक गोष्टी कळू लागल्या आहेत. अनेकदा या माध्यमांमधून त्यांना चुकीची माहिती देखील मिळते आहे. म्हणून मुलांच्या लैंगिक व्यवहारांवर लक्ष ठेऊन त्यांना योग्य माहिती देणं ही पालकांची जबाबदारी आहे. myupchar.com च्या मते, मुलं माझा जन्म कसा झाला असा हा प्रश्न विचारतात आणि मग पालक त्याचं उत्तर देणं टाळतात. त्याऐवजी आईच्या पोटात गर्भपिशवी असते त्यात 9 महिने बाळ वाढते आणि मग त्याचा जन्म होतो, असं मुलांना सांगण्यास हरकत नाही.

10 ते 13 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या असलेल्या मुलांशी चर्चा करा

मूल 10 वर्षे वयाचे होईपर्यंत मुलांना व्यवस्थित लिहायला वाचायला येऊ लागते. ते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी जागरूक होतात. या काळात त्यांच्या शरीरातदेखील बदल होऊ लागतो. मुलगा असो की मुलगी पालकांनी या काळात सतर्क असायला हवं. चुकीची संगत मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, म्हणून पालकांनी लैंगिक संबंधाविषयी त्यांच्याशी सहजतेने बोलायला हवं. रोज वर्तमान पत्रात येणाऱ्या अशा घटनांची चर्चा नाश्ता किंवा चहा घेताना कुटुंबासोबत करायला हवी. ते ऐकून मुलं सतर्क होतात.

15 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले

मूल 15 वर्षांचे होईपर्यंत खूप समजूतदार झालेली असतात. या वयात त्यांची स्वत:ची वैचारिक क्षमता विकसित झालेली असते. अशा मुलांशी त्यांचे विचार जाणून घेऊन, त्यांना समजवायला हवं. कुठल्या वयात शरीर संबंध ठेवणं योग्य असतं, हे त्यांना सांगा. त्यासंबंधीच्या पोक्सो एक्ट विषयीपण त्यांना माहिती द्या आणि वाममार्गला जाण्यापासून रोखा. myupchar.com च्या अनुसार, याच वयात मुलांना एचआयव्ही, एसटीडी अशा लैंगिक संक्रमण आजाराबाबतही माहिती द्यायला हवी.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - लैंगिक शिक्षण आणि आरोग्य

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 19, 2020, 10:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading