कोणत्या राशीसाठी आजचा दिवस शुभ? 12 राशींवर मकरसंक्रांतीचा काय होणार परिणाम

कोणत्या राशीसाठी आजचा दिवस शुभ? 12 राशींवर मकरसंक्रांतीचा काय होणार परिणाम

मकरसंक्रांतीच्या निमित्तानं जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : यंदाच्या वर्षातील संक्रांत 2021 मध्ये गुरुवारी देशभरात साजरी केली जात आहे. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. मकरसंक्रातीच्या दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होते. सूर्य कोणत्या राशीत कोणत्या स्थानी प्रवेश करणार आणि त्याचा काय परिणाम होणार जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष- आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी आज आपल्याला मोठा नफा मिळेल. आज आपण बोलताना थोडा संयम बाळगा.

वृषभ- आज आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आज आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आज आपण गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता.

मिथुन- आज आपल्याला मेहन करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. आपल्या क्षेत्रात यश मिळवणं आज आपल्याला शक्य होणार आहे. आज आपल्याला नव्या संधी मिळतील.

कर्क- आज आपल्याला मानसिक ताणावाला समोरं जावं लागणार आहे. आज आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात.

सिंह- आज आपल्याला स्पर्धापरीक्षेची आणि संयमाची तयारी करावी लागणार आहे. व्यवसायाची संबंधित कामं आज होतील.

कन्या- आज आपण प्रवास करणं टाळायला हवं. आज आपला मानसिक ताण वाढेल. आज आपले पैसे खर्च करायला लागतील.

तुळ- आर्थिक अटींच्या बाबतीत हा कालावधी सामान्य असेल परंतु या कालावधीत आपण कोणत्याही जमीन खरेदी किंवा विक्रीतून चांगले पैसे मिळविण्यास सक्षम असाल.

वृश्चिक- अडकलेलं कार्य आज आपलं पूर्ण होईल. आज आपली प्रतीम खराब होऊ शकते. कोणत्याही प्रवासाला जाणे फायद्याचे ठरेल.

धनु- आज नोकरीच्या ठिकाणी आपल्याला चांगली संधी मिळेल.

मकर - आजचा दिवस आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

कुंभ- वेगवेगळ्या क्षेत्रांतील पैसा खर्च होऊ शकतात. आज कोणत्याही बेकायदेशीर गोष्टीत अडकू नका.

मीन- कान उघडे डोळे नीट ठेवून योग्य सल्ल्यानं निर्णय घ्या. प्रवासाला जाण्यापूर्वी आपली नीट काळजी घ्या कागदपत्र जपून ठेवा.

First published: January 14, 2021, 12:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading