Makar Sankranti 2021: या पदार्थांचा आस्वाद घेत साजरी करा मकर संक्रांत

Makar Sankranti 2021: या पदार्थांचा आस्वाद घेत साजरी करा मकर संक्रांत

गुरूवारी 14 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 14 मिनिटांनी मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. यावर्षी मकर संक्रांतीला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.45 ही वेळ शुभ आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : यंदा मकर संक्रांत (Makar Sankranti) 14 जानेवारी रोजी देशभर साजरी करण्यात येत आहे. 14 जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाते. याच दिवशी हा सण साजरा करण्यामागे देखील काही विशेष कारण असल्याचं सांगितलं जातं. गुरूवारी 14 जानेवारी रोजी मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौर मास म्हणून ओळखला जातो.

हा सण देशभरात वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात अनेकजण तीळगूळ (TilGul) वाटून हा सण साजरा करतात. तीळगूळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत परस्परांमधील राग, द्वेष, भांडणं बाजूला सारण्याचा संदेश या सणातून दिला जातो. काही प्रदेशामध्ये पतंग उडवून हा सण साजरा करतात. याचबरोबर काही खाद्यपदार्थ देखील या विशेष दिवशी बनवले जातात.

यावर्षी संक्रांतीचा शुभ मुहूर्त -

गुरूवारी 14 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 14 मिनिटांनी मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. यावर्षी मकर संक्रांतीला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.45 ही वेळ शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत पूजाविधी करू शकता. याचबरोबर महा पुण्य काळ हा सकाळी साडेआठ वाजता सुरु होणार असून सव्वादहा वाजेपर्यंत हा शुभमुहूर्त आहे.

या खाद्यपदार्थांबरोबर तुमची संक्रांत साजरी करा -

दही चुरा गूळ -

बिहारमध्ये मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी खास हा पदार्थ तयार केला जातो. यामध्ये दही, चिवडा आणि गूळ एकत्र करून दही चुरा गूळ (Dahi Chura Gur) हा पदार्थ तयार केला जातो. बिहारमधील हा पारंपरिक पदार्थ आहे.

खिचडी -

हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हा पारंपरिक पदार्थ खूप लोकप्रिय आहे. दुपारच्या जेवणासाठी खास खिचडी (Khichdi) तयार केली जाते. तांदूळ, डाळी, तूप, विविध भाज्या आणि ड्रायफ्रूट टाकून ही खिचडी तयार केली जाते. ही खिचडी पापड, लोणचं, दही आणि चटणीबरोबर खाल्ली जाते.

तीळ लाडू -

संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो. या दिवशी याला मागणी देखील खूप असते. हिवाळ्यामध्ये उब मिळवण्यासाठी देखील हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तीळ, गूळ आणि शेंगदाणे एकत्रित करून हे तिळाचे लाडू (Til Laddoo) बनवले जातात.

तिळाची चिक्की -

तिळाच्या लाडूप्रमाणेच हा पदार्थ देखील बनवला जातो. हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हा पदार्थ लोकप्रिय असून तीळ आणि गुळाच्या मदतीने तिळाची चिक्की (Til Chikki) तयार केली जाते.

गुळभात -

खीरीचा हा एक प्रकार असून तांदळाची खीर असंही याला म्हणू शकतो. यात तांदूळ, गूळ, दूध आणि ड्रायफ्रूट एकत्र करून गुळभात (Jaggery Rice) हा पदार्थ बनवला जातो. याला काही भागांमध्ये रसियाओ देखील म्हटलं जातं.

Published by: Karishma Bhurke
First published: January 14, 2021, 7:56 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading