Makar Sankranti 2020: राशीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कशी असेल यंदाची मकर संक्रांत

Makar Sankranti 2020: राशीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कशी असेल यंदाची मकर संक्रांत

सूर्य निरयन मकर राशीत ज्यादिवशी प्रवेश करतो. त्याप्रमाणे मकर संक्रांतीचा दिवस ठरतो.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी: सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत (Makar Sankranti 2020) साजरी केली जाते. या दिवशी तीळ, गूळ किंवा तीळ, गूळ आणि खोबऱ्याचं सारण एकत्र करून त्याची वडी किंवा लाडू एकमेकांना दिले जातात आणि तिळगूळ घ्या गोड बोला असं एकमेकांना सांगितलं जातं. मकर संक्रांतीचा हा सण दूर गेलेली मनं जवळ एकत्र आणणारा आणि नात्यातील गोडवा अधिक दृढ करणारा आहे असं सांगितलं जातं. हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अंघोळ करून दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं.

मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या सूर्याचा इतर राशींवरही काय़ परिणाम होतो जाणून घ्या.

मेष- नोकरी अथवा व्यवसाय़ामध्ये अधिक यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ- दुकान अथवा प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम दिवस आहे. महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

मिथुन- आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता.

कर्क- व्यवसायासाठी उत्तम दिवस. पती-पत्नीने वाद होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

सिंह- नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या संधी उपलब्ध होतील.

कन्या- पोटाचे विकार आणि पचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-नात्यात सतत वाद होतायत? पार्टनरशी बोलाताना 'या' 5 गोष्टींचा उल्लेख टाळाच

तूळ- आजचा दिवस शुभ आहे. घर आणि एकूण नोकरी व्यवसायातील आर्थिक गणितं अधिक मजबूत होतील

वृश्चिक- आत्मविश्वास दृढ होतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

धनु- जुन्या मित्र-मैत्रिणी, नातलगांच्या भेटीगाठी होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मकर- आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं. त्वचेचे विकार डोकं वर काढू शकतात.

कुंभ- परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील. नोकरदारांना आजचा दिवस यश मिळवून देणारा आहे.

मीन- राजकीय नेत्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व

पौष महिन्यात इंग्रजी कॅलेंडर नुसार जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण मकर संक्रांत. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. थंडीचे दिवस असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी तीळ गूळ आणि खोबरं एकमेकांना देऊन गोड बोलण्याचा संदेश दिला जातो. या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. तर मुलं पतंग उडवून आपला आनंद साजरा करतात. मकर संक्रांतीनंतर रात्र छोटी आणि दिवस मोठा होण्यास सुरुवात होते.

(वर दिलेली माहिती ही जोतिष्यशास्त्र आणि पंचागानुसार असून राशीभविष्यात करण्यात आलेल्या दाव्याशी News18Lokmat सहमत असेलच असं नाही.)

हेही वाचा-Vegan चा फंडा : बटर, चीजच नव्हे तर दूध, दहीसुद्धा खात नाहीत हे सेलेब्रिटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 09:01 AM IST

ताज्या बातम्या