मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Mahatma Gandhi: यंदा महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

Mahatma Gandhi: यंदा महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण

Mahatma Gandhi speech in Marathi: महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींची जयंती साजरी केली जाते.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India
 • Published by:  Suraj Sakunde

 मुंबई 28, सप्टेंबर: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी कित्येक लोकांनी आपलं आयुष्य वेचलं. कित्येक लोकांनी बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोंबर रोजी जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे तुम्हाला एका गोष्टीची तयारी करावी लागणार आहे. तुमच्या घरातील लहान मुलाला भाषण लिहून देण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. दरवर्षी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शालेय मुलांना भाषण करण्यास सांगितलं जातं. मग तुम्हालाच त्यांच्या भाषणाची तयारी करून घ्यावी लागते. तुम्ही त्यांची भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (Mahatma Gandhi birth Anniversary speech for children) करून घेताना पुढील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात..

 • दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींची जयंती साजरी केली जाते.
 • महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.
 • त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.
 • महात्मा गांधींना बापू म्हणूनही ओळखले जाते.
 • ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यात महात्मा गांधींचे विशेष योगदान आहे.

हेही वाचा: वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्रमैत्रिंणींना द्या खास शुभेच्छा, Whatsappला ठेवा हे सुंदर स्टेटस

 • देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यात बापूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 • लंडनमधून बॅरिस्टरची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या नावासाठी समर्पित केले.
 •  विरोध करण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. आपल्या आयुष्यात त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध अनेक आंदोलने केली.
 • चंपारण्य सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी सत्याग्रह, दलित चळवळ, भारत छोडो आंदोलन या त्यांच्या काही प्रमुख चळवळी आहेत.
 •  ब्रिटिश साम्राज्याचा पाया कमकुवत करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.
 •  सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वाच्या जोरावर त्यांनी इंग्रजांना अनेक वेळा गुडघे टेकण्यास भाग पाडले.
 • हिंसेचा मार्ग अवलंबून तुमचे हक्क कधीच मिळू शकत नाहीत, असे गांधीजींचे मत होते.

 • यंदा महात्मा गांधींची १५२वी जयंती साजरी होणार आहे.
 • आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
 • बापूंचे सत्य आणि अहिंसेचे विचार भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत.
 • लोकांच्या हक्कासाठी ते आयुष्यभर झटले. समाजातील भेदभावाबद्दल त्यांनी सतत आवाज उठवला.

First published:

Tags: Mahatma gandhi, School children