मुंबई, 18 फेब्रुवारी: हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. अनेक जण या दिवसासाठी खास व्रत किंवा उपवास करतात. फाल्गुन महिन्यातील शिवरात्रीला महाशिवारात्र असं म्हटलं जातं. 21 फेब्रुवारीला महाशिवारात्रीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. या दिवस शंकराच्या मंदिराला खास रोषणाई केली जाते.
काय आहे महाशिवरात्रीचं महत्त्व
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता असं मानलं जातं. या दिवशी शंकराच्या पिंडींवर जलाभिषेक केला जातो. जलाभिषेक करणाऱ्याला भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याची मनोकामना पूर्ण करतो अशी मानण्याची प्रथा आहे. या दिवशी अनेक स्त्रिया आणि पुरुष व्रत किंवा उपास करतात.
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त- 21 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून 22 फेब्रुवारी (शनिवारी)संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी केला जाणार जप
ॐ नमो भगवते रूद्राय
ॐ नमः शिवाय रूद्राय् शम्भवाय् भवानीपतये नमो नमः
सकाळी स्नान करून भगवान शंकराला जलाभिषेक करावा. असंही सांगण्यात येतं.
--------------------------------------------------------------------------------------------
हेही वाचा-मुलगी नोकरी करणारीच हवी; लग्न करताना मुलाची का असते अशी अट?
हेही वाचा-तुम्ही ऑनलाइनही होऊ शकता कोरोनाचे शिकार, तुम्हालाही आलाय का असा Email?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.