हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त देशातील 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन

माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ (Mahashivratri) म्हणून ओळखली जाते. त्यानिमित्ताने शंकरदेवाच्या देशातील 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊयात.

  • Share this:

सोमनाथ – गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये असलेलं सोमनाथ हे सर्वात जुनं आणि पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. शिवपुराणानुसार या ठिकाणी चंद्राला शापातून मुक्ती मिळाली होती. त्यानंतर स्वत: चंद्रदेवानं इथं शिवलिंगाची स्थापना केली होती.

मल्लिकार्जुन स्वामी – आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीजवळ असलेल्या श्रीलैश पर्वतावर हे ज्योतिर्लिंग आहे. कैलाश पर्वताइतकंच श्रीलैश पर्वताचंही महत्त्व आहे.

महाकालेश्वर – मध्य प्रदेशातील उज्जैन नगरात हे ज्योतिर्लिंग आहे. हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे. महाकालची भस्मारती खूप प्रसिद्ध आहे.

ओंकारेश्वर – मध्य प्रदेशातील इंदौर शहराजवळ हे मंदिर आहे. ज्योतिर्लिंग ऊँ आकाराचं असल्याने त्याला ओंकारेश्वर नावानं ओळखलं जातं.

केदारनाथ – शंकरदेवाला प्रिय कैलाशप्रमाणेच केदारनाथही प्रिय असल्याने, केदारनाथला खूप महत्त्व आहे. उत्तराखंडात हे ज्योतिर्लिंग आहे.

वैद्यनाथ – 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हे ज्योतिर्लिंग झारखंडमध्ये आहे.

भीमाशंकर – महाराष्ट्रात भीमा नदीच्या काठावर वसलेलं हे ज्योतिर्लिंग मोटेश्वर महादेवाच्या नावानंही ओळखलं जातं.

काशी विश्वनाथ – धार्मिक स्थळात विशेष महत्त्व असलेल्या वाराणसीतील काशीत हे ज्योतिर्लिंग आहे.

त्र्यंबकेश्वर – नाशिकच्या गोदावरीकाठी हे ज्योतिर्लिंग आहे. गौतम ऋषींच्या आग्रहानंतर शंकरदेव इथं ज्योतिर्लिंगाच्या रुपात स्थापित झाले, असं म्हटलं जातं.

नागेश्वर – गुजरातच्या द्वारिकामध्ये असलेलं ज्योतिर्लिंग, जिथं सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे.

रामनाथस्वामी – तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये असलेलं हे ज्योतिर्लिंग स्वत: प्रभू राम यांनी स्थापन केल्याचं सांगितलं जातं, त्यावरून या ज्योतिर्लिंगाचं नाव रामनाथस्वामी असं पडलं.

घृष्णेश्वर – महाराष्ट्रात एलोराच्या प्रसिद्ध गुफा असलेल्या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 08:29 PM IST

ताज्या बातम्या