मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Printed paper मध्ये Food गुंडाळणं Ban; बळावू शकतो Cancer सारखा महाभयंकर आजार

Printed paper मध्ये Food गुंडाळणं Ban; बळावू शकतो Cancer सारखा महाभयंकर आजार

महाराष्ट्राच्या एफडीएने (Maharashtra FDA) प्रिंटेड पेपरमध्ये (Printed paper) खाद्यपदार्थ गुंडाळण्यास बंदीचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्राच्या एफडीएने (Maharashtra FDA) प्रिंटेड पेपरमध्ये (Printed paper) खाद्यपदार्थ गुंडाळण्यास बंदीचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्राच्या एफडीएने (Maharashtra FDA) प्रिंटेड पेपरमध्ये (Printed paper) खाद्यपदार्थ गुंडाळण्यास बंदीचे आदेश जारी केले आहेत.

मुंबई, 24 डिसेंबर : तुम्ही रस्त्यावरील विक्रेत्यांकडून काही खाद्यपदार्थ (Food wrapping in printed paper) विकत घेतले की तुम्हाला न्यूजपेपर किंवा प्रिंटेड पेपरमध्ये गुंडाळून दिले जातात. आता अशा पद्धतीने खाद्यपदार्थ गुंडाळून देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (Maharashtra FDA) याबाबत आदेश जारी केला आहे. प्रिंटेड कागदात खाद्यपदार्थ देऊ नयेत असे आदेश विक्रेत्यांना देण्यात आले आहे (Printed paper Food wrapping ban) .

सामान्यपणे वडापाव, समोसा, भेल असे पदार्थ शक्यतो अशाच कागदात दिले जातात. या पेपरमध्ये असलेली शाई घातक असते. त्यात केमिकल असतं. त्यामुळे अशा पेपर्समध्ये खाद्यपदार्थ देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

एफडीएचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितलं, 2016 मध्ये फूड सेफ्टी एंट स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने एक आदेश जारी केला होती. त्यात खाद्यपदार्थ प्रिंटेड कागदात गुंडाळण्यावर बॅन लावण्यात आला होता. तरीसुद्धा वृत्तपत्रात खाद्यपदार्थ दिल्या जात असल्याच्या बऱ्याच तक्रीरी आल्या आहेत. त्यामुळे आता आदेश जारी करण्यात आला आहे.

हे वाचा - तुम्हीही ब्रेडचा करपलेला भाग खाता का? मग महाभयंकर आजाराला निमंत्रण देताय

6 डिसेंबर 2016 रोजी एफएसएसएआयने सर्व राज्यांना जारी केलेल्या आदेशानुसार भारतात खाद्यपदार्थ वृत्तपत्रात गुंडाळून देणं सामान्य झालं आहे. हे धोकादायक आहे. असे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी धोकादायक आहेच. खाद्यपदार्थ सुरक्षितरित्या बनवले असले तरी शाहीच्या संपर्कात आल्याने ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. कॅन्सरसारखा घातक आजारही होऊ शकतो.

First published:

Tags: Food, Health, Lifestyle, महाराष्ट्र