मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सुंदर दिसतात डोळे पण डोळ्यांसाठी सुरक्षित आहेत का मॅग्नेटिक लॅशेस?

सुंदर दिसतात डोळे पण डोळ्यांसाठी सुरक्षित आहेत का मॅग्नेटिक लॅशेस?

मॅग्नेटिक आयलॅशेसचा वापर करताना काळजी घ्या. (फोटो सौजन्य - Canva)

मॅग्नेटिक आयलॅशेसचा वापर करताना काळजी घ्या. (फोटो सौजन्य - Canva)

मॅग्नेटिक आयलॅशेस वापरणं जितकं सोयीस्कर आहे तितकं ते सुरक्षितही आहेत का, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

मुंबई, 17 ऑगस्ट : डोळ्यांचा मेकअप अगदी बोल्ड आणि नेटका असेल, तर संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप (Makeup Tips) अधिक आकर्षक वाटतो. आजकाल डोळे हायलाइट करणं किंवा मोठे दाखवणं ट्रेंडिंग आहे. काजळ, आयलायनर आणि लॅशेस अशा गोष्टींचा वापर डोळ्यांच्या मेकअपसाठी सर्रास केला जातो; मात्र या सगळ्यासोबतच आजकाल मॅग्नेटिक आयलॅशेसची (Magnetic Eyelashes) क्रेझ वाढत आहे. साधारणपणे आयलॅशेस लावण्यासाठी मुलींना पार्लरमध्ये जावं लागतं; मात्र, मॅग्नेटिक आयलॅशेस तुम्ही घरच्या घरीच लावू शकता. यासाठी ना ग्लूची गरज भासते, ना कोणाच्या मदतीची; मात्र या मॅग्नेटिक लॅशेस जेवढ्या सोयीच्या आहेत, तेवढ्याच सुरक्षितही (Are Magnetic Eyelashes safe) आहेत का, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रात नवनवीन गोष्टी येत आहेत. त्यात मेकअप क्षेत्रही मागे नाही. सध्या वापरण्यासाठी सुलभ अशा रेडी-टू-वेअर गोष्टी वापरण्याची आवड अनेकांना असते. मॅग्नेटिक आयलॅशेस (Benefits of Magnetic Eyelashes) म्हणजेदेखील अशाच प्रकारच्या कृत्रिम लॅशेस आहेत. सर्वसाधारण आयलॅशेस लावण्यासाठी तुम्हाला कुणाच्या तरी मदतीची आणि डिंकाची गरज भासते. ही अगदी किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. मॅग्नेटिक आयलॅशेस (What are Magnetic Eyelashes) लावण्यासाठी मात्र अशा कोणत्याही गोष्टीची गरज नाही. कारण या लॅशेस चिकटवण्यासाठी अगदी छोट्या लोहचुंबकांचा वापर केला जातो. लॅशेसच्या वरच्या आणि खालच्या बाजूला लोहचुंबकांचे दोन थर असतात. ते हलक्या हातांनी आपल्या खऱ्या आय लॅशेसवर लावून हळूच दाबायचं असतं. यातल्या मॅग्नेटमुळे या लॅशेस त्या ठिकाणी चिकटून राहतात. त्याच प्रकारे ते काढण्याची प्रक्रियाही सोपी असते.

हे वाचा - Cholesterol Level: डोळ्यांमधील हा अनैसर्गिक बदल असू शकतो हृदयरोगाचं लक्षण, दुर्लक्ष करणं पडेल महागात

तसं तर मॅग्नेटिक आयलॅशेसचा (Magnetic Eyelashes tips) डोळ्यांवर दुष्परिणाम होत नाही; मात्र त्या लावताना आणि काढताना खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. कारण या लॅशेस काढताना तुमच्या खऱ्या लॅशेसना इजा पोहोचू शकते. सर्वसाधारण कृत्रिम आयलॅशेस लावण्यासाठी डिंकाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे डोळ्यांना खाज येणं किंवा त्वचेवर रिअ‍ॅक्शन येणं असे प्रकार होऊ शकतात. मॅग्नेटिक लॅशेस वापरताना हा धोका आजिबात नसतो. शिवाय, या लॅशेसमध्ये मानवी किंवा सिंथेटिक केसांचा वापर केलेला असतो. त्यातल्या लहान लोहचुंबकांमुळे डोळ्यांना इजा पोहोचत नाही.

हे वाचा - Men Skin Care : पुरुषांनी हे स्किन केअर प्रोडक्ट नक्की जवळ ठेवावे, त्वचा आणि केसही राहतील उत्तम

- तुमच्या मॅग्नेटिक आयलॅशेस इतरांसोबत शेअर करू नका.

- वापरल्यानंतर या लॅशेस स्वच्छ करून एका डब्यात ठेवा.

- त्या लॅशेस उष्ण ठिकाणी ठेवू नका.

- डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्यास या लॅशेसचा वापर त्वरित थांबवा.

- डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर याचा वापर करू नये.

- लॅशेस लावण्यापूर्वी आणि काढण्यापूर्वी हात साफ करा.

First published:

Tags: Beauty tips, Eyes damage, Lifestyle