द सनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. हे वाचा - इवल्याशा हातांनी भरभर कापतो भाजी; चिमुकल्या शेफचा VIDEO पाहून हैराण व्हाल झी न्यूजने द सनच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार चुंबकासारखं शरीर असलेली ही व्यक्ती इराणमध्ये राहते. अबोलफज्ल साबिर मोख्तारी (Abolfazl Saber Mokhtari) असं त्याचं नाव आहे. त्याच्या शरीराला कोणतीही वस्तू अशी चिकटते, जणू काही त्याच्या शरीरात चुंबकच असावेत. काच. लाकूड, लोखंड यासारख्या वस्तू आणि अगदी भाज्या वगैरेही त्याच्या शरीरावर चिकटतात. खरंच याच्या शरीरात चुंबक आहे, त्याच्याकडे अशी चुंबकीय शक्ती आहे का? हे कसं शक्य आहे असे एक ना दोन कितीतरी प्रश्नांच्या तुमच्या मनात गोंधळ झाला असेल. हे वाचा - VIDEO: सुपरमॅनच्या पोशाखात थाटात बस थांबवायला गेला आणि... अबोलफज्लच्या शरीरात कोणतंही चुंबक नाही किंवा त्याच्याकडे तशी शक्ती नाही. तर हे त्याला अवगत असलेलं एक कौशल्या आहे. तो आपल्या शरीरात कोणतीही वस्तू चिकटवू शकतो. ही कला त्याने अगदी कमी वयात शिकून अवगत केली आहे. फक्त स्वतःच्या शरीरावरच नाही तर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावरही तो अशा बऱ्याच वस्तू चिकटवू शकतो.Man has a unique ability to make any object stick to him pic.twitter.com/jRb3ZCYz22
— The Sun (@TheSun) June 2, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iran, Shocking video viral, Viral, Viral videos