मुंबईत सुरू होता Wife swapping चा खेळ, मित्राची बायको म्हणून राहा यासाठी दबाव आणणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद

मुंबईत सुरू होता Wife swapping चा खेळ, मित्राची बायको म्हणून राहा यासाठी दबाव आणणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद

मुंबईतील अशा ग्रुपमध्ये आहोत जिथं पार्टनर बदलून मजा केली जातं, असं या रेल्वे कर्मचाऱ्यानं बायकोला सांगितलं आणि तिच्यावरही यासाठी दबाव टाकू लागला.

  • Share this:

भोपाळ, 02 फेब्रुवारी :  मुंबईत Wife swapping म्हणजे बायकांची अदलाबदल सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या मध्य प्रदेशातील (madhya pradesh) एका रेल्वे कर्मचाऱ्यानं आपल्या बायकोवर यासाठी आपल्या बायकोवर दबाव टाकला. या रेल्वे कर्मचाऱ्याविरोधात त्याच्या बायकोनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नर्स म्हणून कार्यरत असलेली गिरवाईतील महिलेनं रेल्वे कर्मचारी असलेल्या आपल्या पतीनं आपल्यावर वाइफ स्वॅपिंग करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. मुंबईला आपण एका ग्रुपशी जोडलेलो आहोत, जिथं पत्नीची अदलाबदली करून मजा करू शकतो असं त्यानं सांगितलं आणि यासाठी तो तिला मुंबईला नेण्याच्या प्रयत्नात होता. विनोद बघेल असं या आरोपीचं नाव आहे.

विनोद हा या महिलेचा दुसरा नवरा. याआधीच्या नवऱ्यासोबत 2019 साली तिचा घटस्फोट झाला. यानंतर विनोदनं या महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. जानेवारी 2020 मध्ये सोशल मीडियावर तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला पण महिलेनं त्याची मैत्री स्वीकारली नाही. त्यानंतर तो तिला रस्त्यात भेटला आणि तिच्या आधीच्या लग्नाबाबत माहिती असून आता तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेच्या घरी आपल्या नातेवाईकांना नेऊन तिला लग्नाची मागणी घातली. महिला घटस्फोटित असल्यानं तिचं दुसरं लग्न करायचंच होतं. त्यामुळे तिच्या घरच्यांनी या लग्नाला होकार दिला आणि 26 जानेवारी 2020 त्यांचं लग्न झालं.

हे वाचा - पतीने मित्रांच्या मदतीने पत्नीचं केलं अपहरण; दारू पाजून केला सामूहिक बलात्कार

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार महिलेनं सांगितलं, लग्न ठरताच विरोध करूनही विनोदनं चुकीच्या पद्धतीनं शारीरिक संबंध ठेवले. लग्नानंतरही तो 20 दिवस तिच्यासोबत होता आणि त्यानं तिचं शारीरिक शोषण केलं. इतकं नव्हे तर महिलेला पोटगीत जे 25 लाख रुपये मिळाले होते त्यातून गिरवाईमध्ये घर खरेदी केलं. पण नंतर हे घर कर्ज काढून घेतल्याचं तिला समजलं. त्यामुळे तिनं त्याच्यावर पैसे बळकावल्याचाही आरोप केला आहे.

लग्नानंतर लॉकडाऊन लागलं आणि त्यामुळे तिचा पती घरी येऊ शकला नाही त्यामुळे ती आपल्या माहेरी गेली. काही दिवसांपूर्वीच तिचा नवरा आला आणि तिला मुंबईला नेण्याचा प्रयत्न करू लागला. नवऱ्यानं आपण मुंबईला जाऊया. तिथं एक ग्रुप जॉईन केला आहे. जिथं ग्रुप वीकेंड पार्टी होते. या ग्रुपमध्ये लाइफ पार्टनर बदलून एन्जॉय करतात. त्यामुळे तुला तिथं घेऊन जातो आहे, असं सांगितल्यानं तिनं सांगितलं.

हे वाचा - कडक सॅल्युट! खांद्यावर मृतदेह; 2 किमी पायपीट करत महिला पोलीस पोहोचली स्मशाभूमीत

महिलेनं मुंबईला जाण्यास नकार दिल्यानंतर त्यानं तिला मारहाण केली. मग महिलेनं त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.

Published by: Priya Lad
First published: February 2, 2021, 6:20 PM IST

ताज्या बातम्या