• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • गरमागरम चहा प्यायल्यानंतर तुम्ही कप कधी खाल्ला आहे का? या टी स्टॉलवर मिळतो असा कप

गरमागरम चहा प्यायल्यानंतर तुम्ही कप कधी खाल्ला आहे का? या टी स्टॉलवर मिळतो असा कप

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

या टी-स्टॉलवर (tea stall) एका खास कपात चहा (tea cup) दिला जातो. हा चहा प्यायल्यानंतर कप खाऊ शकतो.

 • Share this:
  मदुराई, 10 जुलै : आतापर्यंत तुम्ही चहामध्ये (tea) बिस्कीट, खारी, टोस्ट, बटर असं काहीतरी बुडवून खाल्लं आहे. मात्र चहा प्यायल्यानंतर कप (tea cup) कधी खाल्ला आहेत का? आता तुम्ही म्हणाल कपातील चहा संपल्यानंतर एक तर तो कप स्टिलचा, काचेचा किंवा मातीचा असेल तर आपण धुवून वापरतो आणि प्लॅस्टिकचा असेल तर मग मात्र आपण तो फेकून देतो. चहा प्यायल्यानंतर कप कसा काय खाऊ शकतो? हे कसं शक्य आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र मदुराईतील एका टी-स्टॉलवर चहा पिणारे लोक गरमागरम चहाचा आस्वाद घेतल्यानंतर चहाचा कप खातात. आरएस पाथी नीलगिरी चाय असं या टी-स्टॉलचं नाव आहे. इथं एका खास कपात चहा दिला जातो. हा चहा प्यायल्यानंतर कप खाऊ शकतो. द हिंदूच्या वृत्तानुसार आरएस पाथी नीलगिरी चाय हा टी-स्टॉल खूप जुना आहे. सध्या विवेक सबापाथी हा टी-स्टॉल चालवतात. 1909 साली त्यांचे पणजोबा आर. सबापाथी यांनी आरएस पाथी अँड कंपनी लाँच केली. हा व्यवसाय चालवणारी ही त्यांची चौथी पिढी आहे.  प्लॅस्टिकमुळे होणारे परिणाम लक्षात घेत सुरुवातीला विवेक यांनी प्लॅस्टिकच्या कपाऐवजी कुल्हडमध्ये म्हणजे मातीच्या छोट्या कपात तंदूर चहा देणं सुरू केलं. त्यानंतर एडको इंडियाने तयार केलेल्या या कपांची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी या कपांमधून चहा देणं सुरू केलं. हे वाचा - तुम्हीदेखील जेवणाच्या ताटातील स्वीट डीश सर्वात शेवटी खाता का? होतील गंभीर परिणाम चॉकलेट फ्लेव्हरचा हा बिस्किट कप आहे. यामध्ये 60 मिली गरम चहा जवळपास 10 मिनिटं राहू शकतो. त्यानंतर हा कप वितळू लागतो. मात्र लोक त्याआधीच चहा संपवू शकतात. कारण 10 मिनिटं हा चहा संपवण्यासाठी पुरेसा वेळ आहे. विवेक यांनी 15 जूनपासून अशा कपात चहा दिला जातो. तेव्हापासून दिवसाला कमीत कमी 500 कप चहा विकला जातो. एक कप चहासाठी 20 रुपये द्यावे लागतात. सर्वसामान्य कपपेक्षा या कपात लोकांना चहा प्यायला खूप आवडतो आहे. या कपात चहा पिणं त्यांना जास्त सुरक्षित आणि स्वच्छ वाटतं, असं विवेक यांनी सांगितलं. हे वाचा - VIDEO - हत्तीही पडला चहाच्या प्रेमात; खास रेस्टॉरंटमध्येच घेतो चुस्की खाता येईल अशा कपातून चहा देण्याची आयडीया आपली असल्याचं विवेक सांगतात. मात्र त्यांच्याशिवाय हैदराबादमधील एडको इंडियाद्वारे निर्मित कप मिल्कशेक विक्रेता आणि इतर शहरांमध्येही लोकप्रिय आहे.
  Published by:Priya Lad
  First published: