भोपाळ, 16 डिसेंबर : माकड (monkey) म्हणजे तसा माणसांना हैराण करणारा प्राणी. अनेकदा माकडं मानवी वस्तीत घुसतात आणि माणसांना वैताग देतात, अक्षरश: उच्छाद मांडतात. म्हणून माकडं नकोशी वाटतात. अशाच एका माकडानं संपूर्ण गावाला रडवलं आहे. पण त्या माकडानं वैताग आणला म्हणून नाही तर आता हे माकड वैताग देण्यासाठी या जगात राहिलं नाही म्हणून ग्रामस्थ रडले.
मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) राजपुरातील एका माकडाचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रत्येक घरातून रडण्याचा आवाज येऊ लागला. एखादी व्यक्ती कायमचा जग सोडून गेल्याचं दु:ख प्रत्येकाला होतं. जीवापाड प्रेम असलेल्या पाळीव प्राण्याचा मृत्यू झाल्यासही तशाच वेदना होतात. मात्र माकड म्हणजे तसा माणसांना हैराण करणारा प्राणी. पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण गाव रडलं. इतकंच नव्हे तर त्याची अंत्ययात्राही अगदी वाजतगाजत डिजे लावून काढली.
हे वाचा - कुणी तरी येणार गं..! चक्क पाळीव कुत्रीचे भरवले डोहाळे जेवण, पाहा हा VIDEO
हे माकड गावभर फिरायचं. त्याची सवयच जशी या ग्रामस्थांना झाली होती. गावातील एक सदस्यच तो झाला होता. पण अचानक त्याचा मृत्यू झाला आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. मग ग्रामस्थांनी त्याला आपल्या कुटुंबातील सदस्याला शेवटचा निरोप द्यावा तसा निरोप दिला. अगदी पारंपारिक पद्धतीनं त्याची अंत्ययात्रा काढली. डीजे लावण्यात आला. त्यावर काही जणांनी तालही धरला. अगदी वाजतगाजत त्याची अंत्ययात्रा निघाली, असं वृत्त आज तकनं दिलं आहे.
हे वाचा - कुणी तरी येणार गं..! चक्क पाळीव कुत्रीचे भरवले डोहाळे जेवण, पाहा हा VIDEO
एरवी सामान्यपणे अंत्ययात्रेत पुरुष असतात पण माकडाच्या या अंत्ययात्रेत महिलाही सहभागी झाल्या होत्या. गावातील प्रत्येक जण अंत्ययात्रेत होता. गावात धार्मिक रूढी परंपरा खूप मानल्या जातात. त्यामुळेच माकडाचा धार्मिक विधींशी संबंध जोडत ही अंत्ययात्रा काढण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.