मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फाडफाड इंग्रजी बोलून श्रीमंतांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढणारी 12 वी पास आफिन; सोशल मीडियावर लाखो फॅन्स

फाडफाड इंग्रजी बोलून श्रीमंतांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढणारी 12 वी पास आफिन; सोशल मीडियावर लाखो फॅन्स

मोठ्या शहरातील प्रत्येक पबमध्ये तिला फ्री एंट्री मिळायची. प्रत्येक जण तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला भेटण्यासाठी धडपडतो.

मोठ्या शहरातील प्रत्येक पबमध्ये तिला फ्री एंट्री मिळायची. प्रत्येक जण तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला भेटण्यासाठी धडपडतो.

मोठ्या शहरातील प्रत्येक पबमध्ये तिला फ्री एंट्री मिळायची. प्रत्येक जण तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला भेटण्यासाठी धडपडतो.

  • Published by:  Priya Lad
भोपाळ, 26 डिसेंबर : शिक्षण फक्त बारावी.... पण फाडफाड इंग्रजी बोलणारी... मध्य प्रदेशमध्ये (madhya pradesh) राहणारी आफिन तरन्नुम (affin tarannum). जिला आय कँडी (eye candy) म्हणून ओळखलं जातं. श्रीमंतांना ड्रग्जच्या जाळ्यात (drugs racket) ओढणाऱ्या या ड्रग्जवाल्या आफिनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे ड्रग्जवाल्या आंटीच्या रॅकेटचाही पर्दाफाश झाला आहे. आफिनचे आई-वडिल वेगळे झालेत. वडील परदेशात आणि आई भोपाळमध्ये. तर आफिन इंदोरमध्ये एकटीच भाड्याच्या घरात राहते. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी ती ड्रग्जचा धंद्यात उतरली आणि श्रीमंत तरुणांना आपल्या जाळ्यात ओढू लागली. इंदोरच्या प्रत्येक पबमध्ये तिला फ्री एंट्री मिळायची. पब्जमध्ये नशा केल्यानंतर ती मॉडेल बनून टेबलवर उभी राहायची आणि तरुणांना आपल्याकडे आकर्षित करायची. त्यांच्याशी मैत्री करून त्यांना ड्रग्ज घ्यायला प्रवृत्त करायची. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ टाकून आणि लाइव्ह चॅटिंग करूनही त्यांना आपल्या जाळ्यात ओढायची. जे तिच्याकडून जास्त ड्रग्ज घ्यायचे, त्यांना ती सोशल मीडियावरच ड्रग्ज घ्यायलाही शिकवायची. आफिनच्या मोबाईलमधून अनेक तरुणांचे नंबर आणि ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहेत. सोशल मीडियावर आफिनचे खूप फॉलोअर्स आहेत. तिचे लाखो फॅन्स आहेत. प्रत्येक जण तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला भेटण्यासाठी धडपडतो. हे वाचा - टीव्ही मालिकेतून सुचली आयडिया : तरुणानं केली प्रेयसीच्या मुलाची हत्या आफिन ही  तरुण आणि श्रीमंत मुलांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढणाऱ्या ड्रग्जवाल्या आंटीच्या रॅकेटमध्ये असल्याची माहिती मिळाली. मध्य प्रदेशातील मोठमोठ्या शहरात या ड्रग्जवाल्या आंटीचा धंदा सुरू होता. प्रीती जैन उर्फ काजल असं या आंटीचं नाव आहे.  मुलगा यश जैनसह मिळून ती हा धंदा करायची. यश शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शहरातील प्रमुख बार, होटल, रेस्टोरंटमध्ये पार्टीसाठी बोलवायचा आणि त्यांना ड्रग्ज द्यायचा आणि धंद्यात ही सहभागी करून घ्यायचा. आफिन ही यशची गर्लफ्रेंड. तिच्या फाडफाड इंग्रजी बोलण्यामुळेच यशलाही ती आवडली होती. तर आफिनसह अटक करण्यात आलेला अंकित पबमध्ये बार टेंडर म्हणून काम करायचा. पबमध्ये आलेल्या श्रीमंत तरुणांना आपलं कमिशन काढून आंटीकडून कोकिन द्यायचा. आफिनसुद्धा अंकितचा नंबर द्यायची. हे वाचा - पत्नी आणि चार मुलांची धारदार शस्त्राने हत्या करून तरूणानं स्वतःलाही संपवलं दैनिक भास्करच्या वृत्तानुसार विजय नगर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना तीन दिवसांच्या रिमांडवर घेतलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 आरोपींना अटक झाली आहे.
First published:

Tags: Crime news, Drugs

पुढील बातम्या