मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आंबटशौकिन सासऱ्याला 2 सुनांनी घडवली अद्दल; जावाजावांनी मिळून बदड बदड बदडलं

आंबटशौकिन सासऱ्याला 2 सुनांनी घडवली अद्दल; जावाजावांनी मिळून बदड बदड बदडलं

सासरा (father in law) छोट्या सुनेची (daughter in law) छेड काढायला गेला तिथं मोठी सून आली आणि दोघींनीही त्याला चांगलंच चोपून काढलं आहे.

सासरा (father in law) छोट्या सुनेची (daughter in law) छेड काढायला गेला तिथं मोठी सून आली आणि दोघींनीही त्याला चांगलंच चोपून काढलं आहे.

सासरा (father in law) छोट्या सुनेची (daughter in law) छेड काढायला गेला तिथं मोठी सून आली आणि दोघींनीही त्याला चांगलंच चोपून काढलं आहे.

  • Published by:  Priya Lad

भोपाळ, 10 जानेवारी :  सासरी गेल्यावर सासू-सासरेच प्रत्येक मुलीचे आई-वडील असतात. पण जर त्यांनी आपली मर्यादा ओलांडून जर काही केलं तर सून काय करू शकते, याचाचा प्रत्यय आला तो मध्य प्रदेशात (madhya pradesh). जिथं वाईट नजरेनं पाहणाऱ्या सासऱ्याला (father in law) 2 सुनांनी (daughter in law) चांगलीच अद्दल घडवली आहे. सुनेची छेड काढणाऱ्या या सासऱ्याला जावाजावांनी मिळून चांगलंच बदडून काढलं आहे.

गिरवाई पहाडमध्ये राहणाऱ्या 58 वर्षांचा व्यक्तीला त्याच्या दोन्ही सुनांनी काठीनं चोपून काढलं आहे. सुनांकडे वाईट नजरेनं पाहणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे.

या व्यक्तीची छोटी सून 40 वर्षांची आहे. तिचा नवरा रविवारी काही निमित्तानं तो बाहेर गेला होता. आपल्या खोलीत ती एकटीच होती. शेजारी तिचा मोठा दीर आणि जावयेची खोली आहे. त्या खोलीत तिचा दीर झोपला होता. तेव्हा सासरा तिथं आला आणि त्यानं मोठा मुलगा ज्या खोलीत झोपला आहे, त्या खोलीला बाहेरून कडी लावली आणि तो आपल्या छोट्या मुलाच्या खोलीत जिथं त्याची छोटी सून एकटीच होती तिथं घुसला.

हे वाचा - कान पकडून मागितली माफी; विद्यार्थिनीसोबत छेडछाडीच्या आरोपात माजी आमदाराला अद्दल

व्यक्तीची छोटी सून खोलीत काहीतरी काम करत होती. सासरा तिथं आला आणि त्यानं तिला छेडायला सुरुवात केली. तिनं सासऱ्याला रोखलं, हटकलं, त्याचा प्रतिकारही केला. त्यानंतर ती इतकी घाबरली की मोठमोठ्यानं ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून तिची मोठी जाव तिथं धावत आली. तिनं सासऱ्याचं हे रूप पाहिलं आणि तिचा संतापच उडाला. तिनं थेट सासऱ्याच्या कॉलरलाच हात घातला. कॉलर खेचत सासऱ्याला दोघींनीही बाहेर काढलं. दोघींनीही मिळून काठीनं त्याला बेदम चोपलं. सुनेचा असा अवतार पाहून सासरा चांगलाच घाबरला त्याला घामच पुटला. तो दोघींनीही धमकी देऊन तिथून पळू गेला.

हे वाचा - धक्कादायक! सोशल मीडियावर सुरू होती चाइल्ड पॉर्नची विक्री; दोघांना अटक

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार याबाबत महिलेनं आपल्या पतीला माहिती दिली आणि गिरवाई पोलीस ठाण्यात पोहोचली. सासऱ्याविरोधात छेडछाडीचा आरोप करत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh