ऐकावं ते नवलं! गाणं ऐकल्यानंतर गाय देते भरपूर दूध आणि भरघोस पिकानं हिरवंगार होतं शेत

ऐकावं ते नवलं! गाणं ऐकल्यानंतर गाय देते भरपूर दूध आणि भरघोस पिकानं हिरवंगार होतं शेत

गाणं (song) ऐकून माणसाच्या मनाला एकप्रकारची शांतता मिळते. मात्र प्राणी आणि झाडाझुडुपांवरही म्युझिकचा (music) परिणाम होतो हे ऐकूनच आश्चर्य वाटतं.

  • Share this:

भोपाळ, 15 डिसेंबर : शेतात चांगलं पीक (crop) यावं म्हणून शेतकरी आवश्यक पाणी, खत देतं. गायीनं (cow) भरपूर दूध द्यावं म्हणून त्यांना चांगला चारा दिला जातो. पण कधी शेतात भरघोस पीक यावं आणि गायीनं भरपूर दूध द्यावं यासाठी कोणत्या शेतकऱ्यानं गाणं (song) ऐकवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? खरंतर वाचूनच हे थोडं विचित्र वाटेल आणि असं होत असावं यावर कुणाचाच विश्वासही बसणार नाही. मात्र मध्य प्रदेशातील तरुण शेतकरी असं करतो. या तरुण शेतकऱ्यांना शेती आणि पशूपालनाची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे.

कपूरिया गावात राहणारा आकाश चौरसिया. आपल्या शेताला आणि गायींना म्युझिक (music) ऐकवतो. कारण काय तर शेतात भरपूर पिक येऊन ते हिरवंगार व्हावं आणि गायींनीदेखील भरपूर दूध द्यावं. शेत आणि प्राण्यांना गाणं ऐकवून तो आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्याचं उत्पन्नही वाढतं. आकाश आपल्या या अनोख्या पद्धतीसाठी इतका प्रसिद्ध झाला आहे की प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातील लोकही त्याच्याकडे येतात.

आकाश जैविक पद्धतीनं 16 एकर जमिनीवर शेती करतो. हळद, आलं, टोमॅटो अशी बरीचं पिकं तो घेतो. त्यानं आपल्या शेतात एक मोठा म्युझिक सिस्टम लावला आहे. स्वतःसाठी नाही तर शेतासाठी. शेतांना तो म्युझिक ऐकवतो. गायीचं दूध काढतानाही तो म्युझिक लावायला विसरत नाही. आकाशनं सांगितलं. त्याच्या या प्रयोगामुळे शेतात पीक चांगलं येतं आहे. फळं-फुलं लवकर येत आहेत. गायीची दूध देण्याची क्षमताही वाढते आहे.

हे वाचा - Footpath चा झाला बर्फ आणि पादचाऱ्यांची अशी अवस्था; मजेशीर VIDEO VIRAL

आकाश म्हणाला, शेत हे नैसर्गिकरित्या होतं आपण त्यासाठी काहीच करत नाही. निसर्गाचा एक नियम असतो. आपण फक्त बीज रोवतो आणि निसर्ग त्याचं झाड, वृक्ष बनवतं. सुरुवातीला या प्रक्रियेत मधमाश्या, फुलपाखरू अशा छोट्या छोटया जीवांचाही समावेश होता. ज्यांच्यामुळे झाडांची वाढ चांगली व्हायची. माणसांप्रमाणे झाडाझुडुपांमध्येही तणाल असतो.   जसं माणूस आपला तणाव दूर करण्यासाठी फिल्म पाहणं, शांत ठिकाणी बसणं, गाणी ऐकणं पसंत करतो. तसंच झाडाझुडपांनाही तणाव दूर करण्यासाठी निसर्गानं जैवविविधता दिली. पण आता फुलपाखरू, मधमाश्या फार राहिल्या नाहीत. त्यामुळे मी झाड, पिकांमधील तणाव दूर करण्यासाठी त्यांना म्युझिक ऐकवतो.

हे वाचा - OMG! बाथरूमचा दरवाजा उघडला आणि छत तोडून अचानक आला अजगर; पुढे काय झालं पाहा VIDEO

आकाशचा हा प्रयोग देशभरात पसरला आहे, त्यामुळे इतर राज्यांतूनही शेतकरी त्याच्याकडे प्रशिक्षण घ्यायला येतात. आग्राहून ट्रेनिंग घेण्यासाठी आलेले राजीव कुमार यांनी सांगितलं, जैविक शेतीबाबत मी इथं खूप काही शिकलो. गायींना संगीत ऐकवलं जातं. ज्यामुळे त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेत बराच फरक पाहायला मिळाला. शेतातही याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. तर मुंबईतील योगेश सिंह म्हणाले, इंटरनेटवरून मला आकाशबाबत माहिती मिळाली. आम्ही इथं बरंच काही सिकलो. संगीताचा जीवजंतू, झाडाझुडुपांवर कसा परिणाम होतो हे आम्ही पाहिलं.

Published by: Priya Lad
First published: December 15, 2020, 5:39 PM IST

ताज्या बातम्या