भोपाळ, 10 सप्टेंबर : इंजेक्शन दिल्यानंतर बाळाला (baby injection) ज्या ठिकाणी इंजेक्शन दिलं त्या भागाला सूज येणं किंवा तो लालसर पडणं तसं नवं नाही. इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्या त्वचेवर थोडाफार परिणाम दिसून येतो. मात्र मध्य प्रदेशमध्ये एका बाळाला इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा हात चक्क काळा पडला आहे. रुग्णालयाचा हलगर्जीपणा बाळाच्या आरोग्यावर बेतला आहे.
ही घटना मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील आहे. विदिशाच्या जिल्हा रुग्णालयात 24 ऑगस्टला एका बाळाचा जन्म झाला. जन्मानंतर त्याच्यावर उपचारादरम्यान इंजेक्शन देण्यात आलं. हे इंजेक्शन लावल्यानंतर त्याचा हात काळा पडू लागला. त्याला तात्काळ एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.
आज तकच्या वृत्तानुसार ग्यारसपूरच्या लोहर्रा गावात राहणारे बाळाचे वडील मनोज सेन यांनी सांगितलं, माझी पत्नी मिथलेशने 24 ऑगस्टला एका निरोगी बाळाला जन्म दिला होता. जन्मानंतर त्याला कोणतंतरी इंजेक्शन दिलं आणि त्याला ताप आला. तेव्हा त्याला एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं.
हे वाचा - तब्बल 1220 दिवसांनंतर व्हीलचेअरवरून उठला तरुण, युझर्स म्हणाले 'Real Inspiration'
दरम्यान यानंतर नातेवाईक वारंवार बाळाबाबत विचारणा करत होते, मात्र डॉक्टरांनी त्याची फारशी काही महिती दिली नाही. 5-7 दिवसांनी जेव्हा नातेवाईक पुन्हा आले आणि त्यांन डॉक्टरांवर दबाव टाकला. त्यावेळी बाळाला भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आल्याचं सांगितलं. बाळाचे नातेवाईकांनी तात्काळ भोपाळ गाठलं. रुग्णालयात गेल्यावर त्यांना समजलं तिथं बाळाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचं समजलं.
हे वाचा - पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडलं, पतीनं 1 मिनिटात 31 वेळा चपलेनं केली धुलाई
नातेवाईकांनी बाळाला पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. बाळाचा हात काळा पडला होता. डॉक्टरांनी सांगितलं, त्याच्या हाताला गंभीर संक्रमण झालं आहे आणि शस्त्रक्रिया करून त्याचा हात कापला जाणार आहे.
या बाळाला मुदत संपलेलं इंजेक्शन दिलं होतं. ज्याचं विष बाळाच्या हातात पसरलं असं सांगितलं जातं आहे. मात्र डॉक्टर याबाबत काही अधिकृतरित्या काही सांगण्यास तयार नाहीत.