ब्रिटनमधील नव्या कोरोनाला टक्कर देणार भारतीय लस; औषध कंपनीकडून मोठा दिलासा

यूकेमध्ये (UK) आढळलेल्या नव्या कोरोनाविरोधात (coronavirus New strain) भारतीय लस प्रभावी (india corona vaccine) ठरेल की नाही? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता.

यूकेमध्ये (UK) आढळलेल्या नव्या कोरोनाविरोधात (coronavirus New strain) भारतीय लस प्रभावी (india corona vaccine) ठरेल की नाही? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 30 डिसेंबर : ब्रिटनमध्ये (britain) आढळलेल्या नव्या कोरोनाव्हायरसचे (new coronavirus) भारतात 20 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता नव्या कोरोनाचा धसका सर्वांनी घेतला आहे. नव्या वर्षात कोरोना लशीची (corona vaccine) प्रतीक्षा होती. पण आता नव्या कोरोनाव्हायरसमुळे तो उत्साहही कमी झाला आहे. ही लस नव्या कोरोनावर प्रभावी ठरेल की नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. मात्र ब्रिटनमधील या कोरोनाला भारतीय लस (made in india corona vaccine) टक्कर देणार आहे, असा मोठा दिलासा भारत बायोटेकनं (Bharat Biotech) दिला आहे. कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनविरोधात कोवॅक्सिन (Covaxin)  म्हणजेच BBV152 लस प्रभावी आहे, अशी माहिती ही लस तयार करणाऱ्या हैदराबादमधील भारत बायोटेकनं दिली आहे. कंपनीनं याआधीच या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली आहे. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. कंपनीनं याआधी पहिल्या आणि  दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल जारी केला आहे. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम काही दिवसांपूर्वीच medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आला होता. हे वाचा - खूशखबर! UKमध्ये ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीला मंजुरी; आता भारताच्या निर्णयाकडे लक्ष आता नव्या कोरोनाविरोधातही ही लस प्रभावी असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. शिवाय केंद्र सरकारनंदेखील आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या कोरोना लशी कोरोनाच्या नव्या रूपाविरोधात परिणामकारक असल्याचं मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी सांगितलं, "कोरोनावरील सध्या उपलब्ध असलेल्या लशी यूके आणि आफ्रिकेतील नव्या कोरोनाशी लढण्यास सक्षम आहेत. या लशी नव्या कोरोनापासून संरक्षण देऊ शकत नाही असा कोणताही पुरवा नाही" "या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस. व्हायरसच्या बदलामुळे लशीच्या प्रभावावर काहीही परिणाम होणार नाही. पण त्याला थोडा वेळ लागेल. आपल्याला संयम राखावा लागेल. यावर उपचारासाठी योग्य त्या थेरेपीचा वापर करायला हवा. नाहीतर हा व्हायरस आवाक्याबाहेर जाईल", असं आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी सांगितलं. हे वाचा - अलर्ट! भारतामध्ये झपाट्यानं पसरतोय नवा कोरोना, 20 जणांना लागण व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनमध्ये 17 बदल झाले आहेत. त्यापैकी 8 बदल खूप महत्त्वाचे आहेत.  व्हायरसचा ज्या रिसेप्टरनं मानवी पेशीशी सोडला जातो तो नव्या कोरोनामध्ये अधिक मजबूत आहे, ज्यामुळे तो सहजरित्या संक्रमित होतो.  संक्रमणाचा दर हा 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे हा व्हायरस इतक्या वेगानं पसरतो आहे.
    Published by:Priya Lad
    First published: