आता मॅकडोनल्डचं बर्गर खा 24 तास, इथली स्टोअर्स रात्रीही राहणार खुली

आता मॅकडोनल्डचं बर्गर खा 24 तास, इथली स्टोअर्स रात्रीही राहणार खुली

तुम्हाला McD मध्ये जायला आवडत असेल तर ही चांगली संधी आहे. खास मुंबईकरांसाठी मॅकडोनल्ड (McDonald)आता 24 तास स्टोअर्स खुली ठेवणार आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी : तुम्हाला McD मध्ये जायला आवडत असेल तर ही चांगली संधी आहे. खास मुंबईकरांसाठी मॅकडोनल्ड (McDonald)आता 24 तास स्टोअर्स खुली ठेवणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी नाइटलाइफचा निर्णय घेतल्यामुळे काही कंपन्यांनी आपली स्टोअर्स 24 तास सुरू ठेवण्याचं ठरवलंय. यानुसार 27 जानेवारीपासून मुंबईमध्ये दुकानं, थिएटर्स आणि मॉल 24 तास सुरू राहतील. मॅकडोनल्ड काही ठिकाणी 24x7 रेस्टॉरंट्स सुरू ठेवणार आहे.

कुठे असतील 24x7 स्टोअर्स ?

सुरुवातीला मॅकडोनल्ड मुंबईतल्या 7 ठिकाणी स्टोअर्स सुरू ठेवणार आहे. कांदिवली भागात ग्रोवल 101 मॉलमध्ये मॅकडोनल्ड स्टोअर्स सुरू राहतील. त्याचवेळी अंधेरी इन्फिनिटी मॉल, मालाडमधला इन्फिनिटी मॉल, कुर्ल्याचा फिनिक्स मॉल, लोअर परेलमधलं फिनिक्स मॉल, घाटकोपरचा R सिटी मॉल आणि गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमधली मॅकडोनल्ड स्टोअर्स 24 तास खुली राहतील.

मॅकडोनल्ड फ्रँचायजीची स्टोअर्स मुंबईमधली वेस्टलाइफ कंपनी चालवते.

(हेही वाचा : SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट, या चुका करू नका नाहीतर रिकामं होईल बँक खातं)

उत्तर भारत सोडलं तर पूर्ण देशभरात मॅकडोनल्डचा ब्रँडचा वापर करण्याचा अधिकार फक्त वेस्टलाइफला आहे. मॅकडोनल्ड इंडियाचे साउथ वेस्ट स्ट्रॅटेजी ऑपरेशनचे सीनिअर डायरेक्टरने CNBC TV 18 शी बोलताना म्हणाले, मुंबईमध्ये 24 तास फूड स्टॉल सुरू ठेवण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मुंबईमध्ये पायलट प्रोजेक्टच्या स्तरावर नाइटलाइफ सुरू करण्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली.

(हेही वाचा : कोरोना व्हायरसचा सोन्या-चांदीच्या किंमतींवर परिणाम पण भारतात सोनं महाग)

सध्या काला घोडा, नरिमन पॉइंट, बीकेसी आणि कमला मिल कंपाउंडच्या भागात फूड स्टॉल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाइटलाइफच्या निर्णयानुसार ज्या ठिकाणी दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट उघडी राहतील त्याठिकाणी पार्किंग आणि CCTV ची व्यवस्था सक्तीची करण्यात आली आहे.

================================================================================================

First published: January 24, 2020, 5:19 PM IST

ताज्या बातम्या