मुंबई, 23 जानेवारी : हिवाळ्यात तापमानातील घसरणीमुळे फुफ्फुस आणि पाठीच्या कण्याला अनेक प्रकारे नुकसान होत आहे. थंडीच्या हल्ल्यामुळे स्नायू आणि अस्थिबंधन आकुंचन पावतात. ज्यामुळे स्नायूंचा ताण, मोच आणि अगदी पाठीचा कणा फ्रॅक्चर होऊ शकतो. तर थंड हवेच्या प्रभावामुळे फुफ्फुसांवरही अनेक प्रकारे परिणाम होत आहेत.
विशेषतः ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनिया यांसारख्या श्वसन संक्रमणाचा धोका वाढत आहे. थंड हवेमुळे फुफ्फुसात जळजळ आणि सूज येऊ शकते, ज्यामुळे दम्याचा झटका येऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे लंग म्हणजेच फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी तोंडाची स्वच्छतादेखील तितकीच आवश्यक असते. पाहुयात ओरल इन्फेकशनची काळजी कशी घ्यावी.
Diabetes And Peanut : डायबिटीजच्या रुग्णांनी शेंगदाणे खावे का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
व्यवस्थित ब्रश करा
हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य उत्तम राहण्यासाठी डॉक्टर नेहमी नीट ब्रश करण्याचा सल्ला देतात. व्यवस्थित ब्रश केला नाही तर अनेक आजार, तसेच फुफ्फुसात संसर्ग होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे नियमित ब्रश करावा.
दिवसातून किती वेळा ब्रश करावे?
लोकांना वाटते दिवसातून एकवेळा ब्रश करणे पुरेसे आहे. मात्र डॉक्टरांच्या मते, दिवसातून किमान २ ते 3 वेळा ब्रश करणे खूप महत्वाचे आहे. जसे सकाळी उठल्याबरोबर ब्रश करता तसे रात्रीदेखील ब्रश करणं आवश्यक आहे. कारण जेवणानंतर दातांमध्ये अन्नाचे कण अडकून राहिले तर बॅक्टेरिया वाढू लागतात. अशावेळी जीवाणू फुफ्फुसात पोचण्यास उशीर लागत नाही.
गाईच्या दुधाचे की म्हशीच्या दुधाचे तूप आहे जास्त फायदेशीर, पाहा दोन्हीतील फरक
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle