Lunar Eclipse 2020 : वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर असा पडणार प्रभाव

Lunar Eclipse 2020 : वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर असा पडणार प्रभाव

वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज होणार असून या ग्रहणाचा कालावधी 4 तासांचा आहे.

  • Share this:

वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज शुक्रवारी होणार आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. या ग्रहाणाची खासियत म्हणजे वर्षातलं हे पहिलं ग्रहण आहे आणि ते छायाकल्प म्हणजे penumbral चंद्रग्रहण आहे. या ग्रहणाचा कालावधी आहे 4 तासांचा. पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्रीच खगोलप्रेमींना या चंद्रग्रहणाचा आनंद घेता येणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. या ग्रहणाचा राशींवर कसा प्रभाव असेल जाणून घेऊ

मेष : या राशीसाठी चंद्रग्रहणाचा प्रभाव संमिश्र असेल, व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळतील.

वृषभ : कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता.

मिथुन : चंद्रग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव या राशीवर बघायला मिळेल. वादविवादामुळे नात्यात कटुता येईल.

कर्क : आर्थिक लाभ होऊ शकतात. व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. वाद होण्याची शक्यता.

सिंह : कुटुंबात वादाचे प्रसंग उद्भवतील त्यामुळे सामंजस्य बाळगणं गरजेचं. घरातील मोठ्यांचे सल्ले मिळतील.

कन्या : चंद्रग्रहणाचा फारसा प्रभाव नाही. बाहेरचा प्रवास घडला तर काळजी घ्या.

तुळ : एखादं महत्वाचं काम अडकण्याची शक्यता. मानसिक तणाव जाणवेल. कौटुंबिक वाद टाळा.

वृश्चिक : मन विचलित होऊ शकतं. अनामिक भीतीमुळे त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या.

धनु : आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांसोबत वाद उद्भवतील त्यामुळे सुसंवाद ठेवा.

मकर : जुन्या आजारांचा त्रास होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

कुंभ : समाजातील मान-सन्मान वाढेल. तुम्हाला अपेक्षित अशा गोष्टी घडतील.

मीन : कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. सहकाऱ्यांकडून मान-सन्मान मिळेल.

वाचा : वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आहे वेगळं; विरळ छायेमध्ये 4 तास राहणार चंद्र

(वर दिलेली माहिती ही जोतिष्यशास्त्र आणि पंचागानुसार आहे. News18Lokmat कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lunar
First Published: Jan 10, 2020 09:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading