नवी दिल्ली, 26 मे: यावर्षीचं पहिलच चंद्रग्रहण बुधवारी 26 मे रोजी होणार आहे. चंद्र ग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्राला लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण
(Lunar eclipse) भारताच्या पुर्वेत्तर भागात
(In the Northeast) काही काळ पाहता येणार आहे. जाणून घ्या या चंद्र ग्रहणाबाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं..
केव्हा पाहता येणार ?
चंद्रग्रहण एका प्रकारच्या खगोलीय स्थितीला म्हटलं जातं. पृथ्वी सुर्य आणि चंद्र यांच्या मध्ये आल्याने चंद्र पृथ्वीच्या सावलीमधून जातो. त्याच काळाला चंद्रग्रहण
(Lunar eclipse) म्हटलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी असं ग्रहण लागतं.
याला वैज्ञानिक
(scientific) आणि धार्मिक
(Religious) महत्त्वही आहे. बुधवारी 26 मे 2021 ला दुपारी 2 वाजून 17 मिनीटांना चंद्रग्रहण सुरू होईल आणि 07 वाजून 19 मिनिटानी संपेल. पंचागानुसार चंद्र ग्रहण विक्रम सवंत 2078 ला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्राला लागणार आहे.
(हे वाचा-बुधवारी आहे वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण! हे ग्रहण कुठल्या राशीला करेल मालामाल पाहा)
चंद्रग्रहण कुठे दिसणार?
चंद्रग्रहण पूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि अमेरिकेच्या काही भागात दिसणार आहे. या भागात पुर्ण चंद्र ग्रहण पाहता येणार आहे. पण, भारतात छाया चंद्र ग्रहण पाहता येईल. ज्योतिष शास्त्रानुसार या ग्रहण काळात सुतक पाळण्याची आवश्यकता नाही.
धार्मिक दृष्ट्या चंद्रग्रहणात काय करावं?
या काळात आपल्या ईष्ट देवतेचं स्मरण करावं. ग्रहण संपल्यानंतर पिठ, तांदूळ, सातू, साखर अशा वस्तूंच गरीबांना दान करावं. घरातल्या पदार्थांमध्ये ग्रहण सुरू होण्याआधीच तुळशीची पानं टाकावीत. ग्रहण संपल्यावर आंघोळ करून, घरंही स्वच्छ करावं.
(हे वाचा-...तर रुग्णाला फुलांमुळेही जीवघेण्या आजाराचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध)
ग्रहण काळात मंत्रोच्चार
मंत्रोच्चारणाने घरातील नकारात्मक उर्जा निघून जाते. या काळात हे मंत्र म्हणू शकता.
ओम ह्रीं दूं दूर्गाय: नम: ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं ओम स्वाह: ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद- प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मै नम: ग्रहण काळात हे मंत्रोच्चार केल्याने फायदा होतो.
चंद्र ग्रहणात अशी घ्या काळजी?
चंद्र ग्रहण काळात कोणतंही शुभ कार्य करु नये. या काळात स्वयंपाक बनवू नये आणि काही खाऊ नये. चाकू किंवा धारधार वस्तूने काही कापू नये. देवांच्या प्रतिमा, तुळस यांचा हात लावू नये. ग्रहण काळात झोपू नये.ग्रहण काळात मल-मुत्र विसर्जन करू नयेत.या काळात शारीरिक संबंध करु नयेत. केस विंचरू नयेत. दात घासू नयेत. वादविवाद टाळावेत. गर्भवती स्त्रीयांनी या काळात घराबाहेर जाऊ नये.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.) मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.